Child Care Tips : दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. या दरम्यान अभ्यासाच्या प्रेशरमुळे मुलं फार तणावात असतात. जास्त मार्क्स आणण्याच्या नादात मुलं अभ्यास करताना फार तणावात असतात. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांनी फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. अशातच पालकांचा देखील मुलांना तितकाच सपोर्ट असणं गरजेचं आहे. 


मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं ही अशी गोष्ट आहे ज्यावर ज्येष्ठ, दिग्गज लोकसुद्धा नियंत्रण मिळवू शकत नाहीत. विशेषत: बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांना इमोशनली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. आपलं मूल तणावात आहे आणि भावनिकदृष्ट्या फार वीक फिल करतोय असं जर पालकांना वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन मुलांना पाठिंबा देऊ शकता. 


मुलांना ज्या गोष्टीची भीती वाटतेय त्यावर त्यांना बोलतं करा 


अनेकदा पालकांना असं वाटतं की आपलं मूल हे नेहमीच इतरांपेक्षा पुढे असावं. सगळ्या गोष्टी त्याला करता आल्या पाहिजेत. जेव्हा मुलांच्या अभ्यासाची गोष्ट येते तेव्हा पालक जास्त पझेसिव्ह होतात. मुलांच्या अपयशाशी संबंधित गोष्टी पालकांना ऐकायच्याच नसतात. अशा वेळी मुलांची भीती नेमकी कोणती आहे हे जाणून घ्या. तुमच्या मुलांना भीतीचा सामना करण्यासाठी शिकवा. ज्यामुळे त्यांना कधीच एकटं वाटणार नाही. 


सकारात्मक विचार 


आई-वडील म्हणून तुमचं कर्तव्य आहे की, परिस्थिती कोणतीही असो मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवा. एखाद्या विषयाबाबत मुलाच्या मनात भीती आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर ती भीती मनातून कशी दूर करायची आणि सकारात्मक विचार कसा करावा हे मुलांना शिकवा. 


स्पर्धेची भावना ठेवू नका 


परीक्षेच्या दरम्यान मुलं थोडी स्पर्धेला घेऊनही फार तणावात असतात. अशा वेळी पालकांनी मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. तसेच, त्यांचा तणाव कसा कमी करता येईल याचे प्रयत्न करा. कारण स्पर्धेचा विचार करून जर तुमची मुलं अभ्यास करत असतील तर ते अभ्यासावर नीट लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. 


मुलाला ओरडू नका 


काही मुलं परीक्षेत चांगले परफॉर्म नाही करू शकत. अश वेळी मुलांना विनाकारण ओरडू नका. कारण तुमच्य ओरडण्यामुळे मुलं भावनिक होतात.परीक्षेच्या कालावधी दरम्यान सतत मुलांशी संवाद साधा आणि त्यांन प्रेरणा द्या. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर