Cheapest Destinations in India : अनेकांचे नवनव्या (Cheapest Destinations in India) ठिकाणी फिरायला जायचे प्लॅनिंग सुरू आहेत. थंडीत पर्यटक अनेक सुंदर ठिकाणी पोहोचून मौजमजा करतात. जर तुम्हालाही थंडीची मज्जा एखाद्या सुंदर ठिकाणाहून घ्यायची असेल पण तुमचे बजेट परवडत  नसेल तर काळजी सोडा. कारण येथे आम्ही तुम्हाला अशा 5 डेस्टिनेशन्सबद्दल सांगणार आहोत.तिथे जाण्याचा संपूर्ण खर्च फक्त 5,000 रुपये आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी दिल्ली गाठावी लागेल आणि नंतर दिल्लीहून हा प्रवास सुरु होईल.  चला तर मग या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या डेस्टिनेशन्सवर फिरूया...


कसोल, हिमाचल प्रदेश (kasol)


निसर्गावर प्रेम असेल तर हिमाचल प्रदेशपेक्षा सुंदर ठिकाण असूच शकत नाही. येथील कसोल हे फिरण्यासाठी योग्य ठिकाण आहे. कसोलला जाऊन तुम्ही पार्वती खोऱ्याचा आनंद घेऊ शकता. कसोल ते कुल्लू हे अंतर अवघे 40 किमी आहे. व्होल्वो बसने तुम्ही दिल्ली ते कसोलला जाऊ शकता, ज्याचे भाडे 1,000 रुपयांपर्यंत आहे. तिथे पोहोचल्यानंतर 500 रुपयांत हॉटेल रूम बुक करता येतात आणि कमी बजेटमध्ये जेवणही मिळतं.


मॅक्लोडगंज, हिमाचल प्रदेश (McLeodganj) 


कसोल व्यतिरिक्त हिमाचलमधील मॅक्लोडगंज हे देखील अतिशय सुंदर आणि उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण धर्मशाळेजवळील एक हिल स्टेशन आहे, जे ट्रेकर्सना खूप आवडते. भारतातील सर्वात प्रसिद्ध नामग्याल मठ आणि त्सुगलखांग येथे आहेत. ही जागा अतिशय स्वस्त आहे.


लैन्सडौन, उत्तराखंड (Lansdowne)


लैन्सडौन उत्तराखंडमधील गढवालच्या टेकड्यांवर वसलेले हे पर्यटनप्रेमींचे सर्वात आवडते ठिकाण आहे. पॉकेट कॉस्टमध्ये तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. गर्दीपासून दूर डोंगरांच्या शांततेचा आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ही जागा चांगली शकते. या ठिकाणच्या चांगल्या हॉटेल्समध्ये 700 ते 800 रुपयांत रुम मिळतात.


पचमढी, मध्य प्रदेश (Pachmarhi)


पचमढी हे होशंगाबाद जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्ही पाच हजार रुपयांत भेट देऊ शकता. या ठिकाणचे 2 धबधबे, निसर्ग, लेणी, जंगले, अनेक ऐतिहासिक वास्तू फिरू शकता. इथे तुम्हाला हॉटेलमध्ये 500 रुपयांत रूम आणि स्वस्त जेवण मिळतं. जर तुम्ही भाड्याने जिप्सी घेतली तर ती तुम्हाला 1200 रुपयांपर्यंत मिळेल.


तवांग, अरुणाचल प्रदेश (Tawang)


जर तुमचे बजेट 5,000 रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशातील तवांगला जाऊ शकता. दलाई लामा यांचा जन्म येथेच झाला होता. येथे अनेक सुंदर मठ आहेत. अध्यात्माशी निगडित असण्याबरोबरच निसर्गसौंदर्याच्या कुशीत वसलेले हे पर्यटनस्थळ आहे. सुंदर ऑर्किड अभयारण्य आणि टिपी ऑर्किड अभयारण्य येथे अतिशय सुंदर आहे. दिल्लीहून ट्रेनने इथे येऊन स्वस्त हॉटेल ्स मिळू शकतात. इथलं जेवणही अगदी कमी बजेटमध्ये केलं जातं.


इतर महत्वाची बातमी-


Lonavala Restaurants : फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'ही' 5 ठिकाणं नक्की ट्राय करा