मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागलेला मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे नवी जबाबदारी एन्जॉय करत आहे. नव्या भूमिकेमुळे कामगिरीत सुधारणा करण्यास मदत होईल, असा विश्वास रहाणेने व्यक्त केला आहे.

 
'मी तीन-चार वर्षांपूर्वी भारत अ संघासाठी वेस्ट इंडिज दौरा केला होता. तेव्हा तिथले विकेट्स खूप स्लो होते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट वेगळ्या असतील. बार्बाडोस, जमैकामध्ये चांगल्या विकेट्स असतील' अशी आशा अजिंक्यने व्यक्त केली आहे.

 
'विकेट्स स्पिनर्ससाठी फायदेशीर ठरतील, असं मला वाटतं. वेस्ट इंडिजला गेल्यावरच नेमकी स्थिती समजेल. मात्र हा दौरा रोमांचक असेल. आमच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. आम्ही नुकतीच चांगली कामगिरी केल्यामुळे या दौऱ्यासाठी उत्साही आहोत' असं रहाणे सांगतो.

 
उपकर्णधार म्हणून माझ्या खांद्यावर नवीन जबाबदारी असतील आणि मला जबाबदाऱ्या उचलायला आवडतात. जेव्हा मी कर्णधार म्हणून झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा मी माझ्या टीममधील इतर खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकलो. आम्ही झिम्बाब्वेत जिंकलो आणि आताही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी खात्री रहाणेला वाटते.