Budhaditya Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 मे चा दिवस फार खास असणार आहे. आज मेष राशीत बुधादित्य योग निर्माण होणार आहे. हा शुभ योग तेव्हा निर्माण होतो जेव्हा कुंडलीतील कोणत्याही चरणात सूर्य आणि बुध ग्रह एकत्र विराजमान असतील. हा शुभ योग जुळून आल्याने धन-संपत्ती, सुख आणि यश मिळतं. 

ज्योतिष शास्त्रानुसार, 7 मे 2025 रोजी म्हणजेच 8 मे 2025 रोजी रात्री 12.58 मिनिटांनी हा ग्रह कन्या राशीत असणार आहे. त्याचबरोबर मोहिनी एकादशीचा देखील शुभ परिणाम दिसून येईल. आजच्या दिवशी कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना बुधादित्य योगामुळे चांगलं यश मिळेल. तसेच, तुम्हाला करिअरशी संबंधित नवीन कल्पना सुचत राहकली. तुमच्यातील कलगागुणांना आज चांगला वाव मिळेल. तसेच, दिवसभर तुमचं मन प्रसन्न राहील. व्यवसायात धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. मित्रांचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. बुधादित्य योग जुळून आल्याने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे निर्माण होतील. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. भविष्यासाठी पैसे खर्च करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार भाग्याचा असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम तुम्हाला पूर्ण करता येईल. तसेच, जे तुमच्या कुटुंबात वाद होते ते वाद हळुहळू दूर करता येतील. तसेच, तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या हळुहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

हेही वाचा:                                                                                                           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींना मिळणार सेकंड चान्स, चुकांमधून आत्ताच शिका