Astrology Panchang Yog 8 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 मे म्हणजचे आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस हा दत्तगुरुंना समर्पित असतो. तसेच, आज एकादशी तिथी असल्या कारणाने अनेक शुभ संयोग (Yog) जुळून येणार आहेत. आज चंद्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे. तसेच, उत्तरा फाल्गुनी उपरांत हस्त नक्षत्राचा प्रभाव असणार आहे. आज शुभ ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य योग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या शुभ राशींना अनेक लाभ मिळणार आहे. भगवान विष्णूची या राशींवर विशेष कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या कार्याला चांगलं यश मिळेल. रचनात्मक दृष्टीने तुम्ही विचार कराल. तसेच, जे लोक कला, संगीत, लेखनाशी संबंधित क्षेत्रात आहेत त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. पैशांच्या बाबतीत कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. आजूबाजूचं वातावरण अनुकूल असेल. जोडीदाराचा चांगला लाभ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तसेच, शॉपिंगवर जास्त पैसे खर्च करु नका. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. नवीन कार्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तुमच्या वाणीचा इतरांवर चांगला प्रभाव दिसूनयेईल. आरोग्य चांगलं राहील मात्र निष्काळजीपणा करु नका. पार्टनरबरोबर योग्य संवाद साधा. नवीन गोष्टी शिका.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. आजचा दिवस पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्ही चांगला लाभ घ्या. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणा आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. आज अनपेक्षित तुम्हाला लाभ मिळेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
हेही वाचा:
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)