मुंबई : बाजारात अगदी स्वस्त मिळणाऱ्या काही गोष्टी असतात ज्यांचा आपल्या जीवनात खूप फायदा होऊ शकतो. यातली एक गोष्ट म्हणजे तुरटी.  दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी आहे. आज आपण या स्वस्तात मस्त असलेल्या तुरटीचे फायदे काय काय आहेत ते जाणून घेऊयात... आपण ऐकून असतो किंवा साधारणपणे तुरटीचा वापर हा पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. पाण्यात तुरटी घुसळली की पाण्यातील घाण, गाळ तळाला जातो. याबरोबरच तुरटीचे अन्य अनेक फायदे आहेत. त्वचा आणि आरोग्यासाठी तुरटी एका अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते. यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत.


तुरटीचा वापर कशासाठी होतो.  
जखम झाली असल्यास ती जखम तुरटीच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा धुतली तर त्याचा परिणाम लवकर होतो


पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यातून फिरवावी


त्वचेला दुर्गंधी येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी अथवा गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करावी


दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी 


चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडा फिरवावा यामुळे मुरूमं जाण्यास मदत होते


खोकल्यासाठीही याचा उपयोग होतो पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे


ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवा मरतात


मांसपेशींचा त्रास असल्यास, हळद आणि तुरटी पावडर मिक्स करून आखडलेल्या ठिकाणी लावा.  त्यामुळे मांसपेशींचा त्रास कमी होतो


शेव्ह केल्यानंतर तुरटीचा खडा फिरवा यामुळे घाव झाला तर त्यात पस होण्याची शक्यता कमी होते

चेहरा नेहमी उजळ दिसण्यासाठी तुरटीचा खडा चेहऱ्यावरून फिरवा