Beauty Tips : आपल्या चेहऱ्याबरोबरच हातांचं सौंदर्यदेखील (Skin Care Tips) टिकून राहावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. तुमच्या हातावरील लांब आणि मजबूत नखं (Nails) ही तुमच्या हाताची शोभा आणखी वाढवतात. त्यामुळेच अनेक महिला आपल्या नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी नेल आर्टपासून ते नेल एक्सटेंशनपर्यंत अनेक पर्याय शोधतात. मात्र, प्रत्येक वेळी हा उपाय करणं शक्य होत नाही. आजही नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बहुतेक मुली नेलपेंटचा वापर करतात. त्यामुळेच जर तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार तुमच्या नेलपेंटचा रंग निवडला तर यामुळे तुमच्या नखांचं सौंदर्य अधिक खुलून दिसेल.


सावळ्या दिसणाऱ्या मुली अनेकदा आपल्या हाताला नेमका कोणता नेलपेंटचा रंग शोभेल याबाबत संभ्रमात असतात. हाच विचार त्यांना नेलपेंट लावताना देखील येतो. जर तुमच्या मनात देखील हा प्रश्न निर्माण होत असेल की तुमच्या हाताला कोणत्या रंगाची नेलपेंट शोभून दिसेल तर काळजी करू नका. या ठिकाणी सावळ्या रंगाच्या मुलींनी आपल्या हाताला नेमकी कोणत्या रंगाची नेलपेंट लावावी या संदर्भात आम्ही अधिक माहिती सांगणार आहोत. 


ब्राऊन कलरच्या शेड्स


सावळ्या मुलींच्या हातावर ब्राऊन शेड्सच्या सर्व नेलपेंट फार शोभून दिसतात. यामध्ये, ब्राऊन कॉफी, कॅंडी कोरल, ऑलिव्ह ब्राऊन, शिमर कॉफी कलर तुम्ही ट्राय करू शकता. 


क्लासिक रेड कलर 


फेअर (गोरा रंग) आणि सावळ्या रंगाच्या मुलींच्या हातावर क्लासिक रेड कलर फारच सुंदर दिसतो. या रंगाच्या नेलपेंटमुळे एक प्रकारे रिच लूक येतो. त्याबरोबरच यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो. या रंगाच्या नेलपेंटला तुम्ही एखाद्या समारंभात किंवा ऑफिसमध्ये देखील वापरू शकता. 


बरगंडी रंग 


डार्क स्किन टोन असणाऱ्या मुलींना नेलपेंटमध्ये बरगंडी रंगसुद्धा एक चांगला ऑप्शन असू शकतो. या रंगाच्या नेलपेंटमुळे तुमच्या हाताची शोभा आणखी वाढेल. तसेच, हा रंग फार सुंदर आणि रिच लूक देखील देतो. बरगंडी रंग प्रत्येक स्किन टोनच्या लोकांना शोभून दिसतो. 


पीच कलर नेलपेंट 


तुमची जर त्वचा सावळी असेल तर तुमच्या हातावर पीच कलरची नेलपेंट फार शोभून दिसेल. हा रंग जास्त भडक दिसत नाही. आणि या नेलपेंटमुळे तुमची नखं आणखीनच शोभून दिसतात. या रंगाची नेलपेंट लावून तुम्ही ऑफिसला देखील जाऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या लूकमध्ये लाईट टच द्यायचा असेल तर पीच कलरची नेलपेंट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Skin Care Tips : फक्त मुलीच नाही तर मुलंही स्किन केअरच्या बाबतीत करतात 'या' चुका; वेळीच त्यांना टाळा