Mahashivratri 2022 : भगवान महादेवाच्या शिवपूजनात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की, पुजेच्या साहित्यात फक्त एक बेलाचे पान जरी असेल, तरी ती पूजा सफल मानली जाते, पण तुम्हाला माहित आहे का? शिवपूजनात सर्वाधिक महत्व असलेल्या बेलाच्या पानांना व फळांना देखील आयुर्वेदात खूप महत्व आहे. महाशिवरात्रीच्या निमित्त जाणून घेऊया याचे महत्व ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांच्याकडून..


विषाचा दाह कमी करणारे बेल
ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे सांगतात, पौराणिक माहितीनुसार,  देव आणि दानवांमध्ये श्रेष्ठ कोण यावर समुद्रमंथन पार पडले. या दरम्यान समुद्रातून जेव्हा विषाचा कलश बाहेर आला. तेव्हा सृष्टी रक्षणासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. मात्र त्यावेळी विषाचा दाह शंकरांना सहन होत नव्हता. त्यावेळी याच बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला. आणि बेलाच्या पानामुळे भगवान शंकराच्या विषाचा दाह कमी झाला. असे म्हणतात की, बेलाच्या पानात विष निवारण करणारे तसेच उष्णता कमी करणारे गुण असतात. तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली. 


बेलाच्या पानाचे फायदे
बेलाच्या पानाचा रस पिल्याने आपले शरीर आहारामधील अधिकाधिक पोषक तत्व शोषून घ्यायाला लागत मनाची एकाग्रता वाढते, ध्यान केंद्रित राहते, बेलाच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने हृदय मजबूत राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. असे धारणे यांनी सांगितले. 


गुणकारी बेलाचे फळ
बेलाच्या पानांप्रमाणे बेलाचे फळही तितकेच अतिशय गुणकारी आहे. आयुर्वेदात त्याला मोठे महत्त्व आहे. ग्रामीण भागात जुन्या जाणकारांकडून बेलाच्या या फळाचा वापर केला जातो. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात बेलाचे फळ खाण्याचा सल्लाही दिला जातो.पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ एक रामबाण औषध समजले जाते. बेलाच्या नियमित सेवनाने अपचनही होत नाही. 


रक्ताची कमतरता दूर


बेलाचे फळ खाल्यास रक्ताच्या कमरताही दूर होते आणि आरोग्यदायी अनुभव यायला लागतो.


मधुमेहावर लाभदायी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. जाणकार सांगतात, बेलाच्या पानांचे रोज सेवन केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना फरक जाणवतो. रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो. बेलाच्या फळाचा गर उकळून गुळण्या केल्यास मौखिक आजारापासून मुक्तता मिळते. अशी माहिती ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी दिली.


संबंधित बातम्या


Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीला रात्रीच्या पूजेचे विशेष महत्त्व, 'या' मंत्राचे करा पठण


Maha Shivratri 2022 : 'हर हर महादेव' ; जाणून घ्या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी


Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी 'असे' डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टिकर्स