Corona After Effects : कोरोनामुक्त झाल्यानंतर काहींना थकवा जाणवतो तर काहींना पाठ दुखीची समस्या जाणवते. रिपोर्टनुसार, पाठदुखी आणि कंबरदुखी या समस्या कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना जाणवत आहेत. पाठ दुखी होत असेल तर या टिप्स तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. 


एका संशोधनात असे आढळून आले आहे की डेल्टा व्हेरियंटनं संक्रमित झालेल्या सुमारे 63 टक्के लोकांना पाठदुखीची समस्या जाणवत आहे. काही लोकांना थकवा, चक्कर येणे आणि कंबर दुखी या देखील समस्या लोकांना जाणवत आहेत. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या शरीरात सायटोकिन्स हार्मोन्स अॅक्टिव्ह होतात. या हार्मोन्सचे नेचर हे प्रो इंफ्लामेटरी असते. ज्यामुळे पेशींमध्ये सूज निर्माण होते. सायटोकिन्स प्रोस्टॅग्लॅंडिन (E2) हार्मोन बनवतात. ज्यामुळे डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. 


फॉलो करा या टिप्स


1. जर तुम्हाला सतत पाठ दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेतलं पाहिजे. 
2. त्रास होत असेल तर व्यायाम करू नका.  
3. कोरोनामुक्त झाल्यानंतर स्टॅप-लॅडर पॅटर्नला फॉलो करावे. 
4. दर 2 आठवड्यांनी तुमची शारीरिक क्रिया 30% वाढवा.
5. कोरोनाची लगाण होण्याआधी जर तुम्ही 100 पाऊलं चालत असाल तर तुम्ही या काळात 30 पाऊलं चाला. 
6. पाठिचे सोपे व्यायाम करा.
7. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. थंड पदार्थ खाऊ नका.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर


Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha