Health Tips : दिवसाची सुरुवात चांगली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असे आपण म्हणतो. विशेषत: नाश्त्याबाबत म्हणजेच न्याहारीबाबत आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, न्याहारीचा तुमच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. कारण तो तुमच्या दिवसाची सुरुवात करतो. सकाळी, जेव्हा शरीराला दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा लागते, तेव्हा योग्य नाश्ता तुम्हाला ऊर्जा देण्यास मदत करतो. जरी काही लोक न्याहारीमध्ये काही चुका करतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया, निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करू नये. 
 
तुमची सकाळ कॅफिनने सुरू करू नका 


बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर बेड टी किंवा कॉफी पितात. ही खूप चुकीची सवय आहे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायलात तर तुमच्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढू शकते ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. याशिवाय सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोनल संतुलन बिघडते आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण होते. 
 
सकाळी फळांचा रस टाळा  


फळांचा रस देखील सकाळी रिकाम्या पोटी पिऊ नये. तुम्ही दिवसभरात ताज्या फळांचा रस घेऊ शकता परंतु सकाळी रिकाम्या पोटी फळांचा रस पिऊ नये. यामुळे तुमच्या शरीरात साखरेचे असंतुलन होऊ शकते. जर तुम्हाला प्यायचे असेल तर तुम्ही नाश्त्यानंतर फळांचा रस पिऊ शकता. 
 
जंक फूड 


काही लोक नाश्त्यात सँडविच नक्कीच खातात. तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यात फास्ट फूड आणि जंक फूडचा समावेश करू नका. सँडविच, पिझ्झा, बर्गर आणि सॉसेज इत्यादी खाऊन तुम्ही तुमच्या शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढवत आहात. म्हणूनच असे फास्ट फूड सकाळी न घेणेच चांगले आहे.
 
पांढरा ब्रेड 


जगभरातील बहुतेक लोक न्याहारीसाठी पांढऱ्या ब्रेडचं सेवन करतात. पण आरोग्य तज्ज्ञ ते हानिकारक मानतात. खरंतर, पांढरा ब्रेड मैद्यापासून बनवला जातो आणि त्याचे जास्त सेवन केल्याने तुमचे पचन बिघडू शकते. याशिवाय सकाळच्या दृष्टीने त्यात फारच कमी पोषण असते. तुम्हालासुद्धा जजर तुमची सकाळ निरोगी हवी असेल तर या पदार्थांचं सेवन टाळा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?