मुंबई : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी उपास केला जातो. संकष्टी चतुर्थीसोबत मंगळवारचा दिवसही आहे. जेव्हा कधी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी संकष्टी चतुर्थी होते. अंगारकी चतुर्थीचा थेट संबंध मंगळ ग्रहाशी आहे. मंगळ ग्रहाचा संबंध ताकदीशी आहे. यंदा अंगारकी चतुर्थी 2 मार्चला आली आहे. जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजेचे विधी.


अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त


- संकष्टी चतुर्थी तिथी प्रारंभ - 2 मार्च रोजी सकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी
- संकष्टी चतुर्थी तिथी समाप्ती- 3 मार्च सकाळी 2 वाजून 59 मिनिट


अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा विधी
भल्या पहाटे उठून सर्व कामं आटोपून स्नान करा. यानंतर गणपतीचं प्रार्थना करा. यानंतर चौरंगावर स्वच्छ पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा, त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. आता गंगा जल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा. यानंतर फूलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. मग लाल रंगांचं फूल, जान्हवं, धूप, पानात सुपारी, लवंग, इलायची आणि एखादी मिठाई ठेवा. यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करुन 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यानंतर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची आरती करा.


यानंतर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ या मंत्राचा जाप करा. किंवा ॐ श्री गं गणपतये नम: चा जाप करा.


शेवटी मुहूर्ताच्येवेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करुन तुमच व्रत पूर्ण करा.


चतुर्थीला या गोष्टींचं सेवन करु नये
2 मार्च रोजी फाल्गुन कृष्ण पक्षच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथीला मूळ्याचं सेवन करणं निषिद्ध आहे. ही चतुर्थी सकाळी 2 वाजून 59 मिनिटांपर्यंत राहिल. या दिवशी तीळ खाणं आणि दान करणं शुभ समजलं जातं.