मुंबई: दिवाळीच्या मुहुर्तावर भरभरुन शॉपिंग केली जाते. त्यासाठीच आता ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट अमेझॉननं आपला दुसरा 'ग्रेट इंडियन शॉपिंग फेस्टिव्हल' 17 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
अमेझॉनच्या या फेस्टिव्हलमध्ये पुढील तीन दिवस अनेक ऑफर्स मिळणार आहेत. अनेक स्मार्टफोनवर ऑफर देण्यात आल्या आहेत.
वन प्लस टू (64 जीबी) स्मार्टफोनवर रु. 3000 पर्यंत सूट देण्यात आली आहे.
सॅमसंग ऑन प्रोवर 1200 रुपयापर्यंत ऑफर देण्यात आली आहे.
ऑनर स्मार्टफोनवर 5c वर फ्लॅट 1000 रु. सूट देण्यात आली आहे.
स्मार्टफोनसोबतच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूवरही अनेक ऑफर आहेत. एलईडी टीव्हीवरही घसघशीत सूट देण्यात आली आहे.
तर अॅपलचा 13.3 इंच मॅकबूक एअरबूक लॅपटॉपवर तब्बल 20 हजारापर्यंत सूट देण्यात आहे. 80900 रुपये किंमतीचा हा लॅपटॉप रु. 60850 किंमतीला उपलब्ध आहे.