Health Tips : भोपळा ही अतिशय पौष्टिक भाजी आहे, जी खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. पण अनेकदा भोपळ्याचे नाव ऐकताच लोकांचे नाक-तोंड मुरडायला लागतात. यामुळे तुम्ही अनेक पोषक तत्वांपासून वंचित राहू शकता. अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानेही फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात भोपळ्याच्या बियांचे फायदे. 

हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते : भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. कारण त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. तर मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड त्यांच्या बियांमध्ये आढळतात. जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामध्ये मॅग्नेशियम देखील आढळते, जे हृदय सक्रिय ठेवण्यास मदत करते.

हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त : भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम आढळते, ज्यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हाडांशी संबंधित आजार होण्यापासून रोखतात. यामध्ये फॉस्फरस आणि झिंक देखील आढळतात, त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजाराशी लढण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते.

वजन कमी करते : भोपळ्याच्या बिया चयापचय वाढवतात.त्या हळूहळू पचतात. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामध्ये कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुम्ही हे खाल्ल्याने वजनही कमी होऊ शकते. .

तणाव दूर करण्यास मदत : जर तुम्ही तणावाचा सामना करत असाल तर भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करावा. कारण त्यामध्ये ट्रायप्टोफॅन अमिनो अॅसिड आढळते जे तणाव कमी करण्यास मदत करते.

बीपी नियंत्रित करते : भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक खनिजे आढळतात. जसे मॅंगनीज, तांबे, जस्त आणि फॉस्फरस जे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले खनिजे रक्तातील मीठाचे प्रमाण सामान्य ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

मधुमेहासाठी फायदेशीर : भोपळ्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरतात. भोपळ्याच्या बिया इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबर असल्यामुळे ते पचनक्रिया मंदावते. त्यामुळे रक्तातील साखरेचे कण कमी होतात. स्वादुपिंडाला योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करण्यासाठी वेळ मिळतो.

केसांसाठी फायदेशीर : भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने केसांना खूप फायदा होतो. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांची वाढ वाढवण्यास मदत करतात. यामुळे केस तुटण्याची प्रक्रियाही कमी होते. केस मजबूत आणि सुंदर होतात. तुम्हालाही लांब आणि चमकदार केस हवे असतील तर भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर