मुंबई : दैनंदिन जीवनात होणाऱ्या छोट्या-मोठ्या त्रासांवर आजीबाईच्या बटव्यातील काही पदार्थ उपयुक्त ठरतात. अशाचप्रकारे कोरफडही सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे-केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरतो.
कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो.
कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात.
मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील, तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो.
अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते.
रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो.
कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
डोळे, केस यांची काळजी घेण्यासाठी बहुगुणी कोरफड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Nov 2018 03:33 PM (IST)
मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील, तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -