मुंबई : "झोप आलीय, चल रे चहा प्यायला. डोकं दुखतंय, थोडा चहा पिते", अशी अनेक वाक्य सर्रास ऐकायला मिळतात. चहा हे सर्वाधिक सेवन केलं जाणारं जगातील दुसरं पेय आहे. परंतु चहा प्यायल्याने दात पिवळे होऊ शकतात.

 

युनिव्हर्सिटी ऑफ एलबेट्रा स्कूल ऑफ डेंटिस्ट्रीचे डॉक्टर एवा चाऊ यांचं दावा आहे की, चहामध्ये दूध टाकून प्यायल्यास दातांचे दाग स्वच्छ होण्यास मदत होते.  हे संशोधन इंटरनॅशलन जनरल ऑफ डेंटल हायजीनमध्ये प्रकाशित झालं आहे.

 

माणसांचे काढलेले दात दूध असलेल्या चहात आणि दूध नसलेल्या चहामध्ये 24 तास ठेवले आणि त्यानंतर त्यांचा रंग तपासला. दूध असलेल्या चहामध्ये ठेवलेल्या दातांची चमक वाढली होती. तर काळ्या चहामध्ये ठेवलेले दातांवर दाग दिसले, असं चाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनात दिसलं.

 

दुधात असलेल्या खास प्रोटीनमुळे हे सगळं होतं. हे प्रोटीन दातंचं पिवळ्या डागांपासून संरक्षण करतं आणि दात अधिक चमकदार बनवण्याचं काम करतं.

 

चहामध्ये दूध मिसळण्याचं आणखीही कारणं आहेत, जसं की हे ब्लिचिंगसारखं काम करतं. तसंच दात चमकदार बनवणाऱ्या टूथपेस्टपेक्षाही अधिक परिणामकारक आहे.