Health Tips : निरोगी राहण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला अनेक प्रकारचे संक्रमण, विषाणू आणि परजीवीपासून संरक्षण करण्यास मदत करते. याबरोबरच हे घातक आजारांपासून आपले रक्षण करण्यासही मदत करते. रोगप्रतिकारक शक्तीच्या निरोगीपणामुळे, संपूर्ण जीवनशैली देखील निरोगी राहते आणि तुम्हाला उत्साही देखील वाटते. काही गोष्टींच्या अतिसेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. हे पदार्थ नेमके कोणते या संदर्भात अधिक जाणून घेऊयात.
साखर
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त साखर घेतल्याने पांढऱ्या रक्त पेशी कमी होतात, ज्यामुळे ते रोगांशी लढण्यास सक्षम नसतात आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याबरोबरच जास्त साखरेमुळे डायबिटीजचा धोकाही वाढतो. साखर न घेतल्याने शरीर खूप निरोगी राहतं. तसेच त्वचाही सुधारते.
प्रक्रिया केलेले अन्न
प्रोसेस्ड फूड दिसायला जेवढे रुचकर दिसतात, तेवढेच ते अनहेल्दीही असतात. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्याबरोबरच कृत्रिम संरक्षक आणि अस्वास्थ्यकर चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते.
मद्यपान
जसे आपण सर्व जाणतो की, अल्कोहोल घेतल्याने संपूर्ण शरीर खराब होते, जास्त मद्यपान केल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर खूप वाईट परिणाम होतो आणि अनेक प्रकारच्या इन्फेक्शनला सामोरे जावे लागते. याशिवाय शरीरातील संसर्गाशी लढण्याची क्षमता देखील कमी होते.
तळलेले अन्न
तळलेल्या अन्नामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते, जे खायला चविष्ट दिसतात पण सर्वात वाईट म्हणजे तळलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने जळजळ होण्याची समस्या वाढू लागते. याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा वाईट परिणाम होतो.
शुद्ध धान्य
परिष्कृत धान्यांमध्ये पोषक आणि फायबर कमी असतात, खराब एलडीएल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्स आणि इन्सुलिनची पातळी वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात.
कॅफिनचे जास्त सेवन
कॅफिनमुळे झोप उडते, त्यामुळे आजकाल प्रत्येकजण त्याचे सेवन करू लागला आहे. परंतु, कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने झोपेच्या वेळा बिघडतात. आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती लवकर खराब होते. याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा वाईट परिणाम होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्वाच्या बातम्या :