सुट्टीचा हंगाम जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर व्हिसाचा 2024 हॉलिडे थ्रेट्स रिपोर्ट अंदाज व्‍यक्‍त केला आहे. घोटाळेबाज ई-कॉमर्स व वैयक्तिक खरेदीचे प्रमाण वाढल्‍यामुळे कार्डधारकांची माहिती आणि दक्षता न बाळगणाऱ्या ग्राहकांकडून पैसे चोरण्‍यासाठी विविध पद्धतींचा वापर करतील. खरेदीदारांचे अशा धोक्‍यांपासून संरक्षण करण्‍यासाठी व्हिसा आवश्‍यक टिप्‍स सांगत आहे. ज्‍या चिंतामुक्‍त सुट्टीतील खरेदीचा अनुभव घेण्‍यास मदत करतील. त्यामुळं तुम्ही सुट्टीच्या ताळात व्हिसाच्या टीप्सचे पालन करा. 


1. बनावटी हॉलिडे ई-कार्डस् आणि फिशिंग घोटाळ्यांवर लक्ष ठेवा: 


सायबर गुन्‍हेगार मालवेअर इन्‍स्‍टॉल करण्‍यासाठी अनेकदा खोटे ईमेल्‍स किंवा हॉलिडे-थीम ईकार्डचा वापर करतात. ज्ञात नसलेल्‍या लिंक्‍सवर क्लिक करणे टाळा आणि प्रत्‍यक्ष रिटेलर्सच्‍या वेबसाइटवर ऑफर्सचे सत्‍यापन करा. 


2.फक्‍त विश्‍वसनीय वेबसाइट्सवर खरेदी करा: 


ऑनलाइन शॉपिंग करताना विश्‍वसनीय वेबसाइट्सचा वापर करणे महत्त्वाचे आहे. 'https'सह सुरूवात होणाऱ्या आणि पॅडलॉक आयकॉन दाखवणाऱ्या यूआरएलची खात्री घ्‍या, ज्‍यामधून सुरक्षित कनेक्‍शनचा संकेत मिळतो. या सोप्‍या तपासणीमुळे व्‍यवहारांदरम्‍यान संवेदशनील माहितीचे संरक्षण होण्‍यास मदत होते.


3.अधिक सुरक्षिततेसाठी क्रेडिट कार्डचा वापर करा:


कार्ड पेमेंट्स टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन (२एफए), टोकनायझेशन आणि एसएसएल हँडशेक तंत्रज्ञान अशा वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून फसवणूकीपासून प्रबळ संरक्षण देतात. ही वैशिष्‍ट्ये वैयक्तिक डिवाईस आणि रिटेलर साइट्सदरम्‍यान सुरक्षित डेटा एक्‍स्‍चेंजची खात्री देतात, ज्‍यामुळे गिफ्ट्स खरेदी करताना अधिक सुरक्षितता मिळते.


4.अलर्टस् सेट अप करा आणि नियमितपणे व्‍यवहारांवर देखरेख ठेवा:


 सुट्टीच्‍या हंगामामधील धावपळीदरम्‍यान खरेदींवर देखरेख ठेवणे अवघड ठरू शकते. कोणत्‍याही अनधिकृत व्‍यवहारांना ओळखण्‍यासाठी पेमेंट नोटिफिकेशन्‍स सेट अप करा आणि वारंवार कार्ड किंवा पेमेंट अॅप स्‍टेटमेंट्सचे पुनरावलोकन करा. अनधिकृत व्‍यवहार आढळून आल्‍यास त्‍वरित तक्रार करा.  


5.वैयक्तिक व आर्थिक माहितीचे संरक्षण करा: 


वैयक्तिक व आर्थिक तपशील सेव्‍ह व शेअर करण्‍याबाबत सावधगिरी बाळगा. तसेच, सार्वजनिक वाय-फायवर शॉपिंग करणे टाळा, कारण अनएन्क्रिप्‍टेड नेटवर्क्‍समुळे सायबरगुन्‍हेगारांना डेटा इंटरसेप्‍ट करणे सोपे जाते.   
   
दक्ष राहा आणि या सोप्‍या टिप्‍सचे पालन करा. या टीप्सचे पालन केले तर तुम्‍ही आत्‍मविश्‍वासाने खरेदी करु शकाल. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. ज्‍यामुळे यंदाच्‍या सुट्टीच्‍या हंगामाचा चिंतामुक्‍त व उत्‍साहात आनंद घेऊ शकाल. 


महत्वाच्या बातम्या:


Cyber ​​Security : अँड्रॉईड प्रणालीमध्ये सायबर सुरक्षेचा धोका चिंताजनक, आरोग्यसेवा सर्वाधिक लक्ष्य; सेक्राइटद्वारे इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट 2025 समोर