या 10 पदार्थांमुळे मेंदू होतो सुपरफास्ट
बीटः नायट्रेट मिळवण्याचा बीट हा चांगला स्रोत आहे. नायट्रेटमुळे मेंदूला रक्त पुरवठा सुरळीत करण्याचं काम उत्तमरित्या होतं.
बदामः शरिराला ऊर्जा देणारा हा पदार्थ आहे. एकाग्रता मिळवण्यासाठी आणि काजू, बदाम हे पदार्थ फायदेशीर असतात.
अक्रोडः मेंदुची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अक्रोडचा वापर केला जातो.
टोमॅटोः मेंदूला पोषक असं तिसोपीन हे अँटीऑक्सीडंट टोमॅटोमध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टोमॅटो उपयुक्त आहे.
भोपळाः भोपळ्यांच्या बिया विचारशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात.
लसूणः कॅन्सरच्या काही प्रकारांवर उपाय म्हणून लसणाचा वापर केला जातो. अनेक लोक निरोगी शरिरासाठी लसणाचा वापर करतात.
पाणीः शरीरातील डिहायड्रेशन टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
कॉफीः शारिरीक तणाव कमी करण्यासाठी कॉफी उपयुक्त आहे. एकाग्रता मिळवण्यासाठी दिवसातून कमीत-कमी दोन कप कॉफी प्यावी, असा सल्ला तज्ञ देतात.
ब्ल्यूबेरीजः स्मृतीभ्रंशावरील उपाय म्हणून ब्ल्यूबेरीजचा वापर केला जातो.
मासेः शरिराला आवश्यक असं फॅटी असिड मास्यांमधून मिळतं. मास्यांमध्ये ओमेगा-3 या फॅटचा समावेश असतो. त्यामुळे निरोगी मेंदूसाठी मासे खाणे उपयुक्त आहे.