Job News : बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू देशपांडे (Bombay Shaving Company CEO Shantanu Deshpande ) यांनी अलीकडेच एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. जी समस्या आजच्या काळात जागतिक ट्रेंड बनली आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नोकरदारांच्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जात आहेत. या वयोगटातील लोक त्यांच्या ज्येष्ठता आणि उच्च पगारामुळं कंपन्यांच्या नोकरकपातीत पुढे येत आहेत.
100 जबाबदाऱ्या बचत मात्र शून्य
अचानक नोकरी गमावणे हा त्यांच्यासाठी केवळ एक व्यावसायिक धक्काच नाही तर एक मोठे आर्थिक आणि मानसिक संकट देखील आहे. शंतनू देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 40 व्या वर्षी व्यावसायिकावर खूप जबाबदाऱ्या असतात. जसे मुलांच्या कॉलेजची फी, पालकांची काळजी, गृहकर्ज EMI. पण जेव्हा त्यांची बँक खाती तपासली जातात तेव्हा अनेकदा बचतही खूप मर्यादित असते. अशा परिस्थितीत नोकरी गमावणे हे मोठं संकट आहे. यामुळं केवळ करिअरच्या योजनाच विस्कळीत होतात असे नाही तर एखाद्याचा आत्मविश्वास देखील डळमळीत होतो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, अशा प्रकारच्या नोकरकपातीमुळं 40 टक्के कामगारांमध्ये गंभीर तणाव निर्माण झाला आहे. विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये जेथे मध्यमवयीन पुरुष कुटुंबाची मुख्य जबाबदारी घेतात.
हे कसे टाळू शकतो?
याबाबत माहिती देताना देशपांडे म्हणाले की, या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तीन सूचना दिल्या. या तीन सूचना आहेत- AI सारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये स्वत:ला वाढवा. आर्थिक नियोजन आणि बचत वाढवण्यावर भर देणे आणि उद्योजकीय मानसिकता अंगीकारणे. याचा अर्थ स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी देखील सांगितले की, वयाच्या 40 व्या वर्षी नवीन नोकरी शोधणे किंवा कौशल्ये बदलणे सोपे नाही. कारण या वयापर्यंत लोकांनी 15-20 वर्षे एकाच क्षेत्रात किंवा कौशल्यात घालवली आहेत. परंतु प्रत्येकाकडे नवीन कौशल्ये शिकण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा नसतो.
गुंतवणूक करण्यावर भर देणं गरजेचं
शंतनू देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमचे वय 35 वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास, तुम्ही स्वतःला वेळेनुसार जुळवून घेणे, अपस्किलिंगमध्ये गुंतवणूक करणे आणि आर्थिक बॅकअप तयार ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण करिअरची सुरक्षितता आता फक्त नोकरीवर अवलंबून नाही, तर तुम्ही आधी करत असलेल्या लवचिकतेवर आणि तयारीवर अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या: