UPSC Jobs 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. अलिकडेच, UPSC नं एक भरती अधिसूचना जारी केली असून अनेक पदांसाठी भरती काढली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर अजिबात वेळ घालनू नका. इच्छुक उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत UPSC भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात.
UPSC कडून या भरती मोहिमेद्वारे एकूण 19 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये आर्किव्हिस्टच्या 13 पदांचा, स्पेशालिस्ट ग्रेड III च्या 5 आणि शास्त्रज्ञ 'B' च्या 1 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी विविध पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती.
अर्ज शुल्क
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं अर्ज शुल्क आकारलं जाणार नाही. उमेदवार अर्ज शुल्क रोखीनं किंवा SBI च्या नेट बँकिंग सेवेद्वारे भरू शकतात. उमेदवार व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड देखील वापरू शकतात.
भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती
ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत कागदपत्रांची प्रिंट आऊट आणावी लागेल.
भरती अर्ज दाखल करण्यासाठी कसा कराल अर्ज?
- सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर उमेदवाराच्या होम पेजवर संबंधित सूचना पाहा.
- उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतात आणि विनंती केलेली माहिती प्रविष्ट करतात.
- उमेदवार भरतीसाठी अर्ज फी भरतात.
- आता अर्ज डाऊनलोड करा.
- अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढा.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :