UIDAI Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आधार कार्ड (Aadhar Card) तयार करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे कोणत्या परीक्षेशिवाय ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं लगेच अर्ज करुण या संधीचा फायदा घ्या. या जागेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तुम्हाला विभागानं दिलेला अर्ज डाऊनलोड करावा लागेल. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
UIDAI मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परीक्षेशिवाय यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. तरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग या पदासाठी वयोमर्यादा 56 वर्षांपर्यंत आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 जून असणार आहे. तरी या पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देत आपला अर्ज भरावा.
या साईटवर अधिसूचना पाहा
दरम्यान, ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, ते उमेदवार www.uidai.gov.in या साईटवर जाऊन अधिसूचना पाहू शकतात. ही भरती ऑफलाइन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. पूर्ण मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, उमेदावाराला कागदपत्रे आणि वैद्यकीय पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे.
या पदासाठी वयाची मर्यादा किती?
या भरती प्रक्रियेसाठी वयाची मर्यादा ही 56 वर्ष ठेवण्यात आली आहे. त्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचं वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावं, 56 वर्षाच्या आतील सर्व उमेदवार या पदासाठी पात्र असतील. सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग अधिकारी या दोघांसाठी विशेष पात्रता ठेवण्यात आली आहे. साईटवर जाऊन यासंदर्भाती माहिती वाचा आणि मगच अर्ज करा.
किती मिळणार पगार?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. रिक्त पदांसाठी www.uidai.gov.in या साईटला भेट द्या. या परीक्षांच्या तारखांच्या वेळा नंतर निश्चित केल्या जाणार आहेत. विभागाने दिलेला अर्ज डाऊनलोड करुन भरावा लागणार आहे. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करावा लागेल. सर्व माहिती अचूक भरावी लागेल. अर्जासोबत योग्य कागदपत्रे भरावी लागतील.
या पत्त्यावर अर्ज पाठवा
संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005
महत्त्वाच्या बातम्या:
Government Job : 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी मोठी संधी! 22,000 हून अधिक सरकारी नोकऱ्या, लाखात पगार मिळणार