Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

टीएचडीसी इंडिया लि. आणि पंढरपूर नागरी सहकारी बँक या ठिकाणी भरती निघाली असून त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा ही सर्व माहिती खालीलप्रमाणे, 

टीएचडीसी इंडिया लि.

विविध पदांसाठी एकूण 109 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - इंजिनिअर (सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech/B.Sc.Engg., 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा - 33

वयोमर्यादा - 32 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022

तपशील - www.thdc.co.in

पोस्ट - इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech/B.Sc.Engg., 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा - 38

वयोमर्यादा - 32 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022

तपशील - www.thdc.co.in

पोस्ट - इंजिनिअर (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech/B.Sc.Engg., 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा - 31

वयोमर्यादा - 32 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022

तपशील - www.thdc.co.in

पोस्ट - इंजिनिअर (सिव्हिल) फ्लुइड मेकॅनिक्स, इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स, इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इंजिनिअर (पर्यावरण)

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech/B.Sc. Engg., M.E./M.Tech/MS, १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा - 7 (यात इंजिनिअर (सिव्हिल) फ्लुइड मेकॅनिक्स, इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स, इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशनसाठी प्रत्येकी 1 जागा, इंजिनिअर (पर्यावरण) साठी 3 जागा आहेत)

वयोमर्यादा - 32 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022

तपशील - www.thdc.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये job opportunities मध्ये new openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पंढरपूर नागरी सहकारी बँक

पोस्ट - वसुली अधिकारी

शैक्षणिक पात्रता - 12 वी पास, फायनॅन्स / बँकिंग / पतसंस्थेतला वसुलीचा अनुभव असल्यास प्राधान्य

एकूण जागा - 20

नोकरीचं ठिकाण - पंढरपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर, प्रशसकीय भवन, 4163 बी, नवी पेठ, पंढरपूर – 413304

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2022

तपशील - www.pandharpurbank.com