SSC CGL Final Result 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निकालाची तयारी सध्या सुरु आहे.  सिलेक्शन कमिशनकडून परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राधान्य क्रमाचा फॉर्म देखील याच अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. 


कुठे आणि कसे पाहू शकता?


स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ssc.nic.in या अधिकृत बेवसाईटवर तुम्ही हा निकाल पाहू शकतात. इच्छूक उमेदवारांनी 27 एप्रिल ते 1 मे दरम्यान हे फॉर्म भरावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे आरक्षित आणि अनारक्षित उमेदवारांसाठी एकूण 36,012 जागा भरल्या जातील. 


लवकरच निकाल जाहीर होणार...


आयोगाने 1 ते 12 डिसेंबर दरम्यान स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेतल्या होत्या आणि त्याचा निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील परिक्षा 2 ते 7 मार्चदरम्यान ऑनलाईन घेतल्या होत्या आणि त्याचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. 


आपल्या देशात स्पर्धात्मक परीक्षा (compititive exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. आपल्या देशात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्पर्धा परीक्षांचीही संख्या सर्वात जास्त आहे. या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशनबद्दल (SSC) माहितीच असेल.  तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केला असेल आणि तुमचे 10 आणि 12 वीचे शिक्षण झाले असेल तर तुम्हा स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊन वरिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करु शकता. 


स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे काय?


भारताने सरकारने 1975 साली स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्थापना केली. सध्या एससीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परिक्षा घेऊन कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. जे विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण होतात त्यांची विवध विभांगांमध्ये निवड केली जाते. ही निवड स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे करण्यात येते. एससी या परीक्षेची व्याप्ती मोठी असून बऱ्याच पदांची भरती याद्वारे केली जाते. एससीच्या परीक्षांकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेचीसुद्धा आवश्यकता असते. या आयोगामुळे अनेक विद्यार्थ्यांना करिअरसाठी नव्या संधींची दारं खुली झाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या: