SSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची (Government Jobs) इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) डिसेंबर 2022 पूर्वी 42 हजार पदांवर मोठी भरती करण्यात येणार आहे. कर्मचारी निवड आयोग लवकरच 15 हजार 247 पदांसाठी नियुक्ती पत्र जारी करणार आहे. ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन महिन्यात पार पडेल. पीआयबीनं (PIB) या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. पीआयबीनं पुढे सांगितलं आहे की, डिसेंबरपूर्वी 42 हजार पदांवर मोठी भरती करण्यात येणार आहे.


सध्या अग्निपथ (Agneepath Scheme) योजनेवरून देशातील वाढलेलं तापमान पाहता 42 हजार पदांवरील भरती ही मोठी बातमी मानली जात आहे. कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) डिसेंबरपूर्वी 42,000 पदांवर भरती केली जाणार आहे. तर आगामी काळात आयोगाकडून 67 हजार 768 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.






कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये 15 हजार 247 रिक्त पदांसाठी नियुक्ती पत्र जारी करण्यात येईल. 2022 वर्ष संपण्याच्या आधी 42 हजार सरकारी रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. बेरोजगारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगानं आगामी परीक्षांच्या आधारे 67 हजार 768 रिक्त जागा त्वरित भरण्याची योजना तयार केली आहे.






दीड वर्षात 10 लाख जणांना रोजगाराची संधी


अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षामध्ये 10 लाख तरुणांना रोजगाराची संधी उपल्बध करुन देणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता विविध सरकारी विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्याची योजना आखली जात आहे.