SBI Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या बँकेत विविध पदांवर बंपर भरती होणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवार अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 442 व्यवस्थापकीय आणि विविध पदांसाठी भरती केली जाईल.



SBI SCO Recruitment 2023: निवड 'अशा' प्रकारे केली जाईल
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा देशभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर होणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत यांचा समावेश असेल.



SBI SCO Recruitment 2023 : अर्ज फी किती असेल?
या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. तर SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग इत्यादीद्वारे अर्ज फी भरू शकतात.



SBI SCO Recruitment 2023 : या तारखांकडे विशेष लक्ष द्या
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 16 सप्टेंबर 2023
अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख: 16 ऑक्टोबर 2023
परीक्षेची अपेक्षित तारीख: डिसेंबर 2023- जानेवारी 2024



SBI SCO Recruitment 2023 : अर्ज कसा करावा?
1: सर्व उमेदवार प्रथम SBI करिअर पेज sbi.co.in/web/careers वर जा.
2: त्यानंतर उमेदवार होम पेजवरील SCO 2023 नोंदणी लिंकवर क्लिक करा
3: नंतर उमेदवार नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रिया करा
5: त्यानंतर फॉर्म सबमिट करा
6: यानंतर अर्ज डाउनलोड करा
7: शेवटी पुढील गरजांसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.


 


गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी, 80 हजार पगार
गुगलकडून हिवाळी इंटर्नशीप (Google Winter Internship Program 2024) साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशीपसाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 80,000 रुपयांपर्यंत मोबदला मिळेल. त्यामुळे गुगलसारख्या कंपनीसोबत इंटर्नशीप आणि त्यासोबतच दर महिन्याला चांगला पगार मिळवण्याची ही संधी अजिबात सोडू नका. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. गुगल विंटर इंटर्नशीप प्रोगामसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करा


 


इतर महत्वाच्या बातम्या


Ajit Pawar : 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू , शक्य तितक्या वेगानं भरती सुरू