SBI Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच, 17 मे 2022 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI ची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, SBI स्पेशल कॅडर ऑफिसरच्या एकूण 35 जागा आहेत. यामध्ये 29 पदांची कंत्राटी पद्धतीनं भरती होणार असून 7 पदांची नियमित भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे.


महत्वाच्या तारखा :


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022
VP आणि Sr. स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2022
व्यवस्थापक आणि सल्लागार पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2022
लेखी परीक्षेची तारीख : 25 जून 2022
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख : 16 जून 2022


रिक्त जागांचा तपशील :


सिस्टम ऑफिसर : 7 पदं
कार्यकारी : 17 पदं
वरिष्ठ कार्यकारी : 12 पदं
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 1 पद
उपाध्यक्ष आणि प्रमुख : 1 पद
वरिष्ठ विशेष कार्यकारी : 11 पदं
व्यवस्थापक : 2 पदं
सल्लागार : 4 पदं


निवड प्रक्रिया


या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल, जी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. सिस्टम ऑफिसर (चाचणी अभियंता आणि वेब डेव्हलपर) या पदासाठी व्यावसायिक ज्ञान चाचणी (150 गुणांपैकी) आणि मुलाखत (25 गुणांपैकी) यांचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.