Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण 22 उमेदवारांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, AICTE व विद्यापीठाच्या नियमानुसार उमेदवारांची पात्रता असणं आवश्यक आहे. तसेच पीएच.डी. अभ्यासकांना संशोधन मार्गदर्शन व उद्योग सल्लागार म्हणून कार्य करण्याची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2025 आहे.
कोण कोणत्या पदांसाठी भरती सुरु?
1. प्रोफेसर आणि विभागप्रमुख (HOD), असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर
एकूण जागा: 04विषय: संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, ई अँड टीसी, एआय/एमएल, इंग्रजीपात्रता: संबंधित विषयातील शैक्षणिक पात्रता असलेले फ्रेशर व अनुभवी उमेदवार
2. डीन (अकॅडेमिक्स आणि R&D)
एकूण जागा: 02पात्रता: आर अँड डी संस्थांमध्ये अनुभव असलेले, औद्योगिक व्यावसायिक
3. परीक्षा नियंत्रक (Controller of Examinations)
एकूण जागा: 02पात्रता: प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून अनुभव
4. ग्रंथपाल (Librarian)
एकूण जागा: 01पात्रता: संलग्न विद्यापीठाच्या नियमानुसार
5. ऑफिस अधीक्षक (Office Superintendent)
एकूण जागा: 01पात्रता: किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर उमेदवार
6. लॅबोरेटरी असिस्टंट (सर्व शाखांसाठी)
एकूण जागा: 06पात्रता: डिप्लोमा इन इंजिनिअरिंग
7. कंप्युटर DTP ऑपरेटर
एकूण जागा: 02पात्रता: MCA व चांगली संगणक कौशल्ये
8. सॉफ्ट स्किल ट्रेनर
एकूण जागा: 02पात्रता: किमान 5वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर उमेदवार
कसा कराल अर्ज?
दरम्यान, पात्र उमेदवारांनी ईमेलद्वारे अर्ज पाठवावेत. hr@witsolapur.org या ईमेलवर अर्ज करण्याची विनंती केली आहे. अधिक माहितीसाठी www.witsolapur.org या वेबसाईटचा वापर करा यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही 21 ते 55 वर्षे (शासकीय नियमानुसार शिथिलता लागू) असणार आहे.