Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या (Govt Job) शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आली आहे. आसाम (Assam) राज्यात पदवीधरांसह 10वी पास असणाऱ्यांसाठी देखील भर्ती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळं जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असूनही काही कारणास्तव आजतागायत अर्ज करू शकले नाहीत, त्यांनी त्वरित फॉर्म भरावा. आज म्हणजेच शुक्रवार 29 डिसेंबर 2023 ही या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर नोकरीची मोठी संधी आली आहे. तुम्ही आसाम राज्यामध्ये रिक्त पदांसाठी अर्ज करु शकता. 12600 पदांसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 29 डिसेंबर 2023 आहे.


या वेबसाइट्सवरून अर्ज करा


अर्ज फक्त ऑनलाइन असतील, ज्यासाठी तुम्ही या दोनपैकी कोणत्याही वेबसाइटला भेट देऊ शकता.  sebaonline.org आणि assam.gov.in. येथूनही अर्ज करता येणार असून सविस्तर माहिती देखील मिळू शकते.


रिक्त जागांचा तपशील


या भरती मोहिमेद्वारे एकूण 12600 पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी 4055 पदे श्रेणी एक म्हणजेच पदवी स्तरावरील आहेत. 3127 पदे श्रेणी दोन म्हणजेच HSSLC स्तरावरील आहेत आणि 418 पदे श्रेणी तीन म्हणजेच HSSLC स्तरावरील आहेत. 10वी ते ग्रॅज्युएशन पास असलेले उमेदवार या रिक्त पदांसाठी फॉर्म भरू शकतात. या पदांसाठी 18 ते 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सवलत मिळेल.


निवडीसाठी परीक्षा द्यावी लागणार 


या पदांवरील निवड परीक्षेचे अनेक टप्पे पार केल्यानंतर केली जाईल. सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाईल. यानंतर कौशल्य चाचणी घेतली जाईल. हे पोस्टनुसार बदलू शकते. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवाराचीच अंतिम निवड केली जाईल. या रिक्त पदांची विशेष बाब म्हणजे अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. इतर कोणतेही तपशील किंवा अद्यतने जसे की परीक्षेची तारीख इत्यादी जाणून घेण्यासाठी, वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा.


महत्त्वाच्या बातम्या:


Bank Job : सेंट्रल बँकेत नोकरीची भन्नाट संधी! 484 पदांसाठी भरती; लगेच दाखल करा अर्ज