RRB JE Recruitment 2024 Last Date Today नवी दिल्ली: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. रेल्वे भरती बोर्डानं काही दिवसांपूर्वी 7951 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अद्याप ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांना तातडीनं अर्ज दाखल करुन या भरतीद्वारे रेल्वेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करु शकतात. मात्र, आज त्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल. 

 

रेल्वेनं ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी अर्ज मागवले होते. याभरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ज्यांना या पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी आरआरबीच्या वेबसाईटला भेट देऊन तातडीनं अर्ज दाखल करावा.  

 

अर्ज दुरुस्तीनंतर साठी नंतर सुविधा 


आज रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाईटवर ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकदा अर्ज दाखल केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे. अर्ज दुरुस्तीची विंडो 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या दरम्यानच्या काळात तुम्ही तुमच्या अर्जात दुरुस्ती करु शकता.  

 

रेल्वे भरती बोर्डानं भरती प्रक्रियेद्वारे ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 7951 पदांसाठी भरती  केली जाणार आहे. ज्युनिअर इंजिनिअर, डेपे मटेरिअल निरीक्षक, केमिकल अँड मेटालर्जिकल अस्टिटंट या या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. rrbcdg. gov. in या वेबसाइट अर्ज सादर करण्यात आले.  

 

कोण अर्ज करु शकतं?


या पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई किंवा बीटेक पदवी उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. केमिकल आणि मेटालर्जिकल असिस्टंट पदासाठी उमेदवारानं फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासह उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. 18 ते 35 वयोगटातील पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. इतर माहितीसाठी उमेदवार आरआरबीच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.  

 

निवड प्रक्रिया


आरआरबी ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी सीबीटी-1 आणि सीबीटी-2 अशा दोन लेखी परीक्षा द्याव्या लागतील. या परीक्षा पास झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी होणार आहे.  

 

अर्जाचं शुल्क 


आरआरबीच्या ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये शुल्क द्यावं लागेल. महिला आणि दिव्यांग उमेदवारांना 250 रुपये शुल्क असेल. या भरतीद्वारे निवड होणाऱ्या उमेदवारांना 35400 ते 44900 रुपयांपर्यंत पगार मिळेल. रेल्वेच्या इतर सुविधांचा देखील त्यांना लाभ मिळेल.  

 

इतर बातम्या :