RRC NR Recruitment 2023 : उत्तर रेल्वेने बंपर भरती जाहीर केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), उत्तर रेल्वेने शिकाऊ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उत्तर रेल्वेच्या विविध विभाग, युनिट आणि वर्कशॉपमध्ये ही भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrcnr.org या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करू शकतात. या रेल्वे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. या भरती अंतर्गत उत्तर रेल्वेच्या विविध विभाग, युनिट्स आणि वर्कशॉप्समध्ये एकूण 3093 शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.


RRC NR Apprentice Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा


अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 11 डिसेंबर 2023


अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2024 


RRC NR Apprentice Recruitment 2023 : वयोमर्यादा


या भरतीसाठी उमेदवाराचं वय 11 जानेवारी 2024 रोजी 15 वर्षांपेक्षा जास्त आणि 24 वर्षांपेक्षा कमी असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.


RRC NR Apprentice Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता


या भरतीसाठी किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, सरकारने मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


RRC NR Apprentice Recruitment 2023 : अर्ज फी


या भरतीसाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरावं लागेल. SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना सवलत देण्यात आली असून त्यांना कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही. 


RRC NR Apprentice Recruitment 2023 : निवड कशी होईल?


या रेल्वे भरतीसाठी उमेदवारांची निवड अर्जांच्या छाननीवर आधारित असेल. परीक्षा आणि मुलाखतीशिवाय निवड केली जाईल.


RRC NR Apprentice Recruitment 2023 : अर्ज दाखल कसा करायचा?


उत्तर रेल्वेने अद्याप भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. अधिकृत वेबसाइटवर भरतीसाठी लिंक तीन दिवसांनंतर म्हणजेच 11 डिसेंबर 2023 पासून सक्रिय होईल.


सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलाय जॉब माझा (Job Majha). विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसा अर्ज करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्हीदेखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. 


 महत्त्वाच्या इतर बातम्या  :


Government Job Alert : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? रेल्वे, बँकेसह विविध ठिकाणी बंपर भरती; सविस्तर माहिती वाचा