Amazon Employee News : नोकरी (Job) सरकारी असो वा खासगी, आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सर्वांना कठोर परिश्रम करावे लागते. दिलेल्या वेळेत दिलेलं कामं योग्य रित्या पार पाडावं लागतं. यासाठी नोकरी करताना मोठं कष्ट करावं लागतं. पण, फक्त कल्पना करा की तुम्ही काहीच काम करत नाही आणि तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला पगार मिळत राहतो, असा विचार करणंही अवघड वाटतं. पण, असाच काहीसा प्रकार ॲमेझॉनच्या (Amazon) एका कर्मचाऱ्यासोबत (Employee) घडला आहे. जवळपास वर्षभरापासून आपण काहीच करत नसल्याचा दावा त्या कर्मचाऱ्याने केलाय. असे असूनही त्याला सतत पगार मिळत आहे.
ॲमेझॉनच्या या वरिष्ठ कर्मचाऱ्याने ब्लाइंड ॲपवर आपली कहाणी सांगितली आहे. या ॲपवर कर्मचारी त्यांची ओळख न सांगता एकमेकांशी बोलू शकतात. त्याची कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी लिहिले की, मी सुमारे दीड वर्षांपासून ॲमेझॉनमध्ये काम करत आहे. मला Google Layoff मध्ये काढून टाकण्यात आले. यानंतर मी ॲमेझॉनवर आलो. इतका वेळ मी इथे रोजच वेळ घालवला आहे. आजपर्यंत मी कोणतेही काम केलेले नाही, तरीदेखील मला पगार मिळत असल्याचा दावा कर्मचाऱ्याने केलाय.
बहुतांश वेळ मीटिंगमध्ये जातो
कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इतके दिवस मी काहीही न करता ॲमेझॉनमध्ये काम करत आहे. मी दर आठवड्याला 8 तास माझी ड्युटी करतो. यातील बहुतांश वेळ मीटिंगमध्ये जातो. मी काहीही अतिशयोक्ती करत नाही. या प्रदीर्घ काळात मी फक्त 7 समस्या सोडवल्या आहेत. यावेळी, मी एक डॅशबोर्ड तयार केला आणि तो कंपनीला दिला, जो चॅटजीपीटीच्या मदतीने केवळ 3 दिवसांत तयार झाला. तथापि, मी माझ्या कंपनीला सांगितले आहे की ते तयार करण्यासाठी 3 महिने लागले.
पोस्ट वेगाने व्हायरल
दीड वर्षाच्या काळात मी 3.1 कोटी रुपयांचा पगार घेतल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे. आहे. या काळात मी विशेष कोणतेही काम केले नसल्याचे सांगितले. हे काम किती दिवस चालेल माहीत नाही. या पोस्टला अंदाजे 30 हजार व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, माझा भाऊ ड्रीम जॉब करत आहे. दुसऱ्याने कमेंट केली आहे की, तुमचे आभार, मला असे वाटते की मला पगार कमी आणि काम जास्त आहे. मला तुझा हेवा वाटतो. मोठ्या पदावर काम करावे.
महत्वाच्या बातम्या: