Private Job: भारतात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, पण जेव्हा प्रमोशन (Promotion) किंवा पगार वाढवण्याची वेळ येते, तेव्हा कर्मचाऱ्यांना हेच सांगितलं जातं की तुमच्या कामातील मेहनतीमुळे तुमचं प्रमोशन केलं जात आहे किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट (Increment) दिली जात आहे.


पण आता प्रश्न असा पडतो की, मेहनत नेमकी कोणती होती? ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवण्याची? की इतरांपेक्षा जास्त काम करण्याची? की ऑफिसच्या कामात सर्वात व्यस्त आहे हे दाखवण्याची? त्यामुळे, ऑफिसमध्ये सर्वात व्यस्त दिसणारा कर्मचारी हा बाकी सर्वांपेक्षा खरंच जास्त आणि चांगलं काम करतो का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.


स्लॅक अहवाल काय म्हणतो?


सेल्सफोर्सची उपकंपनी असलेल्या स्लॅकने जगभरातील कंपन्यांच्या 18 हजारांहून अधिक डेस्क कर्मचाऱ्यांचा अभ्यास करुन एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जगातील इतर खंडांच्या तुलनेत आशियातील कर्मचारी कामात व्यस्त राहण्याचा दिखावा करण्याचा सर्वाधिक प्रयत्न करतात.


या अहवालात आशियातील स्लॅकचे टेक इव्हेंट नियोजक डेरेक लेनी यांनी सांगितलं की, आशियामध्ये कर्मचारी भविष्यात पुढे कसं जाता येईल यावर विचार करण्याऐवजी त्यांचा जास्त वेळ हा ऑफिसच्या मीटिंग अटेंड करण्यामध्ये घालवतात, ज्यात कंपनीचे ध्येय (Company Achievements) कितपत पूर्ण झाले यावर चर्चा केली जाते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशा मीटिंग अटेंड करणाऱ्यांमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांची संख्या जगातील इतर देशांपेक्षा जास्त आहे.


अहवालानुसार, आपल्या कामगिरीबद्दल बोलण्यासाठी मीटिंगमध्ये सर्वाधिक वेळ घालवणाऱ्या जगभरातील देशांची यादी खालीलप्रमाणे आहे-


भारत : 43%
जपान : 37%
सिंगापूर : 36%
फ्रान्स : 31%
युनायटेड किंग्डम : 30%
ऑस्ट्रेलिया : 29%
जर्मनी : 29%
युनायटेड स्टेट्स : 28%
दक्षिण कोरिया : 28%


या देशांतील कर्मचारी मीटिंगऐवजी प्रत्यक्ष काम करण्यात सर्वाधिक वेळ घालवतात


दक्षिण कोरिया : 72%
ऑस्ट्रेलिया : 71%
जर्मनी : 71%
युनायटेड स्टेट्स : 71%
युनायटेड किंग्डम : 70%
फ्रान्स : 69%
जपान : 63%
सिंगापूर : 63%
भारत : 57%


काय म्हणतात तज्ज्ञ?


टाइम्स ऑफ इंडियाला या प्रश्नाचं उत्तर देताना, कॅपस्टोन पीपल कन्सल्टिंगच्या सीईओ सुजाता बॅनर्जी यांनी एक लेख लिहिला आहे. त्यांच्या मते, सर्वोत्कृष्ट कर्मचारी (Best Employee) होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक ध्येय निश्चित (Goal Set) करावं लागतं आणि त्या दिशेने एक पाऊल टाकावं लागतं. म्हणजेच, एक चांगला कर्मचारी तो असतो जो एक ध्येय निश्चित करतो आणि ते पूर्ण केल्यानंतर लगेच दुसऱ्या ध्येयाकडे वळतो.


व्यस्त दिसणारे कर्मचारी चांगलं काम करतात असं नाही


तर पुढे त्या म्हणाल्या, ऑफिसमध्ये असे काही कर्मचारी असतात, जे तुम्हाला नेहमी कामात व्यस्त दिसतील. त्यांना पाहून आपल्याला असं वाटत की, खरंच हे किती काम करतात. पण खरं पाहता, त्यांनी त्यांच्या कामात कोणतंही नियोजन किंवा ध्येय ठेवलेलं नसतं, त्यांना फक्त एखादं टार्गेट पूर्ण करायचं असतं. कामात तसा दर्जाही नसल्यामुळे ते कंपनीला त्या प्रकारचे निकाल देऊ शकत नाहीत. नियोजन (Planning) आणि ध्येय सेट (Goal Set) करणारे कर्मचारी कंपनीला चांगले निकाल देऊ शकतात.


हेही वाचा:


Karnataka: उडपीतील कॉलेजमध्ये मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून व्हिडीओ प्रकरण; सीआयडी तपासाचा पहिला टप्पा पूर्ण