NTPC Jobs 2022 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एनटीपीसीमध्ये बंपर पोस्टवर भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाईट www.ntpc.co.in ला भेट द्यावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे.

रिक्ति जागांचा तपशील 

एकूण पदं : 864इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदं : 280मैकेनिकल इंजिनियरिंग पदं : 360इलेक्ट्रॉनिक्स एंड इंस्ट्रूमेंटेशन इंजिनियरिंग पदं : 164सिविल इंजिनियरिंग पदं : 30मायनिंग इंजिनियरिंग पदं : 30

शैक्षणिक पात्रता

भरती अर्ज करण्यासाठी, उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी संबंधित स्पेशलायझेशनमध्ये किमान 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, GATE 2022 मध्ये वैध रँक देखील.

वयोमर्यादा 

अधिसूचनेनुसार भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 

निवड प्रक्रिया 

GATE 2022 स्कोअर आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 

वेतन श्रेणी 

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 40,000 रुपये ते 1,40,000 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.

अर्ज शुल्क 

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा कराल? 

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सनं 186 कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.