NICL AO Recruitment 2024 : नॅशनल इन्शुरन्समध्ये (National Insurance Company) विविध प्रशासकीय अधिकारी पदांवर भरती करण्यात येत आहे. या भरती अंतर्गत 250 हून अधिक पदांवर भरती (NICL AO Recruitment 2024)  करण्यात येत नॅशनल इन्शुरन्समध्ये विविध प्रशासकीय अधिकारी भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जे उमेदवार NICL AO भरती परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज दाखल करा.


नॅशनल इन्शुरन्समध्ये 274 पदांवर भरती


नॅशनल इन्शुरन्समध्ये 274 प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भरतीसाठी घेण्यात येत आहे. सोमवारी 22 जानेवारी हा या अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस.नॅशनल इन्शुरन्स प्रशासकीय अधिकारी भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट nationalinsurance.nic.co.in वर अर्ज दाखल करु शकतात. शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्या टाळण्यासाठी, उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज दाखल करावा. 


NICL AO Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील


या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 274 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.



  • डॉक्टर                               28

  • लीगल MBBS                      20

  • वित्त                                   30

  • वास्तविक                            02

  • माहिती तंत्रज्ञान                     20

  • ऑटोमोबाईल इंजिनियर्स        20

  • हिंदी (राजभाषा) अधिकारी     22

  • नियमित भरती                    130

  • बॅक लॉग                             02  


NICL AO Recruitment 2024 : अर्ज फी


नॅशनल इन्शुरन्स भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावं लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली असून त्यांना फक्त 250 रुपये शुल्क भरावं लागेल.


NICL AO Recruitment 2024 : अर्ज कुठे आणि कसा करायचा?



  • NICL AO भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सर्वात आधी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Nationalinsurance.nic.co.in वर जावं लागेल.

  • यानंतर होमपेजवरील करिअर विभागातील सक्रिय लिंकवर क्लिक करा.

  • उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल.

  • यानंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करा.

  • आता अर्जात योग्य माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा.