Indian Navy Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. नौदलात अधिकारी पदांसाठी या जागा निघाल्या आहेत. भारतीय नौदलात 250 जागांसाठी शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार, १८ ते २७ वर्षे वयोगटातील इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. २९ सप्टेंबर 2024 ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महिन्याकाठी या पदांसाठी ५६१०० रुपयांचा पगार देण्यात येणार असून याबाबची संपूर्ण माहिती वाचा..
भारतीय नौदलात ssc ऑफिसर पदासाठी अर्ज करता येणार असून या भरतीची शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, वयोमर्यादा तसेच अर्ज कुठे व कसा करायचा?पाहूया..
अधिकारी पदासाठी २५० जागांची भरती
भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी पदांसाठी २५० जागांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
नौदलात अधिकारी पदासाठी ही जाहिरात असून बीई किंवा बीटेक ६० टक्के मार्कांनी पास होणे आवश्यक आहे. तसेच १० व १२ वीच्या परीक्षेतही ६० टक्के मार्कांनी पास होणे आवश्यक आहे. महिला व पुरुषांसाठी ही भरती असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२४ ही आहे.
भरतीसाठी कुठे कराल अर्ज?
शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे त्यांनी अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा.अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील जाहीरात वाचावी..
बँकेतही भरती सुरु
तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल आणि बँकेत करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने 2024 मध्ये BC पर्यवेक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्षे दरम्यान असावे. तुम्ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी किंवा तरुण उमेदवार असल्यास, तुमचे कमाल वय 65 वर्षे असावे. या भरती अंतर्गत निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची कामगिरी अंतिम निवडीमध्ये भूमिका बजावेल.
हेही वाचा:
Bank Job : परीक्षा न देता बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख किती?