Medical Aesthetics : 2022 हे भारतातील सौंदर्यशास्त्र उद्योगाला एक नवे वळण देणारे वर्ष ठरणार आहे. आपण कोरोना साथीतून बाहेर पडत पुढे जात असून आपले जीवन पुन्हा रुळावर येत असले तरी, उद्योगांना उभारी घेण्यास आणखी काही कालावधी लागेल. 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे विविध मागणीत मोठी घट झाली तर 2021 मध्ये मागणी तुलनेने वाढली परंतु अजूनही ही मागणी कोरोना साथीच्या आधीच्या काळाइतकी नाही. हे वर्ष कोरोना काळातून बाहेर पडण्याचे आणि सोबतच उद्योग जगाला नवीन उंचीवर घेऊन जाणारे असेल.


सध्या सोशल मीडिया हा एक सर्व वयोगटासाठी महत्वाचा घटक आहे. त्यावर वेळ घालवणे, सेल्फी शेअर करणे आणि अधिक सुंदर दिसण्यासाठी फिल्टर हे फीचर वापरणे सध्याचा ट्रेंड बनू पाहत आहे. यावरुन लोकांना सध्या स्वत:ला बाह्य स्वरुपाद्वारे चांगले सादर करायचे किंवा दिसायचे आहे असे जाणवते. एका अंदाजानुसार 2022 मध्ये सौंदर्यविषयक प्रक्रियांची लोकप्रियता अधिकच वाढतच जाईल. आमच्या अंदाजानुसार त्यापैकी नॉन-इनव्हॅजिव (कमी तीव्रता) सौंदर्य प्रक्रियांची वाढ अधिक जलद गतीने होईल आणि त्याचा प्रभाव सौंदर्यशास्त्राच्या क्षेत्रात जास्त राहिल. कोरोना काळात, सौंदर्यशास्त्राच्या नावीन्यतेमध्ये आणि संशोधनात घट झाली असली तरी आता साथीच्या आजारातून बाहेर पडत असताना या उद्योगाचे अधिक पुनरुज्जीवन झालेले दिसेल. तसेच काही नवीन मशीन आणि तंत्रज्ञानाची भर पडत याचे आणखी पुनरुज्जीवन होईल, अशी शक्यता आहे. 


सौंदर्यशास्त्रातील आहेत हे काही ट्रेंड:


* फिटनेससह आहे तसे नैसर्गिक आणि निरोगी दिसायला सर्वांना आवडते. म्हणूनच येत्या काळात सौंदर्यविषयक उपचार वारंवार केले जातील. त्यामुळे नियमित आरोग्य उपचार आणि सौंदर्यविषयक उपचारांमधील अंतरही कमी होत जाईल. 


* लोकांना नैसर्गिक दिसावेसे वाटते, परंतु त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू नयेत म्हणून शस्त्रक्रियेऐवजी वेगळया पर्यायांचा विचार करताना ते दिसत आहेत.


* सेलिब्रिटींवर आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सौंदर्यशास्त्रातील नवनवीन ट्रेंड पडताना दिसतात. हे तरुणाईला त्यांचे स्वतःचे स्वरुप बदलण्यासाठी प्रभावित करताना दिसतात.


* 2020 पासून, बरेच लोक घरातून काम करत आहेत. यामुळे वजन खूप वाढल्याचे दिसून येते. कोविडचा प्रभाव जसजसा कमी होईल तसतसे शरीर अधिक आकर्षक करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढेल.


* लोक स्वच्छतेबद्दल अधिक जागरुक झाल्याने एकदाच वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांना जास्त मागणी दिसेल  


* पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात कमी जागरुकता असल्याने मोठे दवाखाने उपचारांबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर अधिक भर देतील. 



यावर्षी सौंदर्याधारित उद्योग क्षेत्र काही ट्रेंड निर्माण करेल. ते खालीप्रमाणे... 


1. बोटॉक्स आणि फीलर्स उपचारांची लोकप्रियता वाढेल


2019 आणि 2020 या दोन्ही वर्षांमध्ये चेहऱ्याचा कायाकल्प हा सर्वात लोकप्रिय सौंदर्य उपचारांपैकी एक होता. हा उपचार कल 2022 मध्येही सुरु राहील. बहुतेक सौंदर्यशास्त्र उपचारांना अपेक्षित परिणाम दिसण्यास वेळ लागतो (काही आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत). याला मात्र, बोटॉक्स आणि फीलर्स (सुरकुत्या घालवण्यासाठी केले जाणारे उपचार) अपवाद आहेत. कारण याचे परिणाम झटपट मिळतात. मात्र, या उपचारांबाबतची उघडपणे चर्चा होत नाही. बोटॉक्सचे उपचार हा चेहरा आणि शरीरात मोठा बदल करतो. याचा सामाजिक स्वीकार वाढेल अशी अपेक्षा आहे. कारण, येत्या काळात अधिकाधिक लोक या उपचारांची निवड करतील आणि म्हणूनच ते अधिक स्वीकारले जातील.


अंदाज - 
बोटॉक्स आणि फीलर्स हा भारतातील लोकप्रिय सौंदर्याचा उपचार बनेल. सध्या लेझर केस काढणे हा प्रथम तर त्या पाठोपाठ बोटोक्स उपचार दुसऱ्या  क्रमांकावर आहे. वर्षाच्या अखेरीस ती भारतातील सर्वात लोकप्रिय सौंदर्यशास्त्र उपचार बनू शकेल. भविष्यात बोटॉक्स आणि फीलर्सद्वारे गाल वाढवणे, भुवया उचलणे आणि नॉन-इनवेसिव्ह फेस लिफ्ट हे उपचार लोकप्रिय होतील, अशी शक्यता आहे. 


2. शस्त्रक्रिया विरहित नाकाची सौंदर्य प्रक्रिया (रायनोप्लास्टी)


नाक चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम करते. पूर्वी, रायनोप्लास्टी ही नाकाची रचना बदलण्याची एक सामान्य शस्त्रक्रिया होती. अलीकडे, शस्त्रक्रियाविरहित रायनोप्लास्टी किंवा लिक्विड रायनोप्लास्टी खूप लोकप्रिय झाली आहे. लोकप्रियतेच्या आकडेवारीनुसार ही प्रक्रिया 2022 मधील सर्वोत्तम सौंदर्य उपचारांचा एक एक भाग असेल. नाकाचा आकार बदलण्यासाठी ही प्रक्रिया इंजेक्शनद्वारे फीलर करता येते. याद्वारे रुग्णाला रायनोप्लास्टी शस्त्रक्रियेसारखेच परिणाम दिसून येतात. या प्रक्रियेतून बरे होण्याचा वेळ सुमारे दोन आठवडे आहे तर पारंपारिक रायनोप्लास्टीला 4 ते 6 आठवडे लागतात. ही प्रक्रिया अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होते आणि त्याचे अपेक्षित परिणाम लगेच दिसून येतात. 


अंदाज - 
भविष्यात शस्त्रक्रियाविरहित रायनोप्लास्टी फीलर्स ही प्रक्रिया अधिक लोकप्रिय होईल असा अंदाज आहे. त्यासाठी जास्त काळ टिकणारे आणि वारंवार प्रक्रिया करण्याची गरज नसलेले नवीन प्रकारचे फीलर बाजारात येतील. 


3. कायमस्वरुपी मेकअपची क्रेझ


कायमस्वरुपी मेकअप म्हणजे भुवयांचे मायक्रोब्लेडिंग, ओठांचे मायक्रोपिग्मेंटेशन आणि स्काल्प मायक्रोपिग्मेंटेशन होय. हा सौंदर्यशास्त्रातील उपचारांचा एक प्रकार आहे. या प्रकाराची गेल्या वर्षी खूप चलती होती आणि 2022 मध्ये त्याची लोकप्रियता वाढतच जाईल. टॅटूचा प्रभाव निर्माण करण्यासाठी विविध तंत्रे आणि उपकरणे वापरली जातात. यामध्ये मायक्रोपिग्मेंटेशन आणि मायक्रोब्लेडिंगसारख्या तंत्रांचा समावेश आहे. या प्रक्रियेचे परिणाम कायमस्वरुपी नसून ते 12 ते 24 महिन्यांच्या दरम्यान टिकतात. तसेच त्यानंतर ते पुन्हा करता येतात.


गेल्या काही वर्षांत या प्रक्रियेला वेग आला आहे. साथीच्या काळात लोक ऑनलाईन जास्त वेळ घालवत असल्याने, त्यांना स्वत: नेहमी चांगले दिसायचे आहे. कामाचे स्वरुप बदलल्याने कामाचे वेळापत्रकही खूप लवचिक बनले आहे. त्यामुळे मीटिंग देखील विक्रमी वेळेत ठरवल्या जाऊ शकतात. कायमस्वरुपी मेकअप करुन, लोक नेहमी कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी तयार असतात.


अंदाज -
2022 मध्ये मायक्रोब्लेडिंग आणि मायक्रोपिग्मेंटेशन उपचारांची लोकप्रियता वाढत राहिल. टॅटू शाईची गुणवत्ता सुधारेल आणि ग्राहकांना अधिक रंग पर्याय उपलब्ध करुन दिले जातील.


4. आयव्ही आधारित ग्लुटाथिओन थेरपी 


काळी त्वचा असणारे नेहमीच फिकट त्वचा किंवा गोरा रंग दाखवणाऱ्या उपचारांच्या शोधात असतात. भारतातील बहुतेक काळसर त्वचेच्या लोकांमध्ये, या उपचारांना येथे नेहमीच जास्त मागणी असते. फिलिपिन्स प्रजासत्ताकसारख्या देशांमध्ये "जादुईप्रमाणे त्वचा गोरा करणारा" रेणू म्हणून पिढ्यानपिढ्या ओळखल्या जाणाऱ्या, ग्लुटाथिओन जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याची लोकप्रियता भारतात वाढत आहे आणि भारतातील बहुतेक सौंदर्यशास्त्र क्लिनिक आता त्वचा उजळण्यासाठी आयव्ही आधारित ग्लुटाथिओन थेरपी देत आहेत.


अंदाज - 
आयव्ही आधारित ग्लुटाथिओन थेरपी आता भारतात एक क्रेझ बनली आहे आणि 2022 मध्ये तिची लोकप्रियता अधिकच वाढेल. भारतातील लोक फिकट त्वचाधारित उपचार शोधत असल्याने, ही प्रक्रिया अधिक आवडीची राहिल.


5. आयव्ही व्हिटॅमिन थेरपी 


आयव्ही व्हिटॅमिन थेरपी रुग्णांना आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमिनो अॅसिडची पुरेशी मात्रा मिळवून देते. हे सर्व पोषक घटक थेट रुग्णाच्या रक्तप्रवाहात इन्फ्युजन लाईनद्वारे पुरवले जातात. ही उपचारपद्धत शरीराला पेशिका स्तरावर बरे करण्यास उपयुक्त ठरत आहे. 


दरम्यान, या विशिष्ट उपचारासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत तसेच कोणत्याही वैद्यकीय अभ्यासातून हे उपचार चांगले आरोग्य राखण्यासाठी पूर्णपणे आवश्यक आहे हे देखील दिसून आले नाही. तरीही आयव्ही व्हिटॅमिन थेरपी आवडणारे रुग्ण आहेत. या थेरपीमुळे त्यांचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत झाल्याचा दावा रुग्णांनी केला आहे. 


अंदाज -
सोशल मीडियावर आजकाल आयव्ही व्हिटॅमिन थेरपी चर्चेत आहे. अर्थात हा सगळा प्रकार काय आहे हे पाहणे सामान्यांना आवडेल. म्हणून ही थेरपी एका वेगळ्या वळणावर पोहोचू पाहत असून 2022 मध्ये लोक या उपचारासाठी वेडे होतील. यामुळेच ही सर्वात ट्रेण्डिंग असलेली सौंदर्य उपचारपद्धती ठरेल.


निष्कर्ष आणि सारांश
लोक चांगले दिसण्यासाठी त्यांच्या बाह्य स्वरुपाची काळजी घेऊ लागले आहेत. म्हणून सौंदर्यशास्त्रातील ट्रेंड नवीन उंचीवर आणि वळणावर पोहोचला आहे. पूर्वी, लोकांना त्यांचे बाह्यस्वरुप बदलण्यासाठी किंवा सौंदर्य वाढवण्यासाठी धोकादायक शस्त्रक्रियांद्वारे बदल करावे लागायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता, लोक शस्त्रक्रियाशिवाय त्यांना हवे असलेले बदल प्राप्त करु शकतात. येथे नमूद केलेले सौंदर्यविषयक ट्रेंड आधीपासूनच सौंदर्य उपचारांच्या यादीत अग्रस्थानी आहेत किंवा अग्रस्थानी जात आहेत. 2022 मध्ये सौंदर्याचा अभ्यासाबाबतचा प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.


आरोग्य सेवा पुरवठादारांनी त्यांच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी लोकसंख्याशास्त्र आणि नियोजित लक्ष्य विचारात घेणे आणि एक नियोजित योजना आखणे आवशक आहे. साथीचा रोग संपलेला नाही म्हणून केवळ टिकून राहण्यासाठीच नव्हे तर वाढ आणि समृद्धी चालू ठेवण्यासाठी सराव करणे आवश्यक आहे. ग्राहक, कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांसह या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी सुरक्षितता आणि खबरदारीही तितकीच महत्त्वाची आहे.


नव नवीन ट्रेंड उदयास येत असताना सौंदर्यविषयक औषधांचा ट्रेंड सतत बदलत असतो. आज जे लोकप्रिय आहे ते उद्या इतके लोकप्रिय नसेल. जसजसे लोक त्यांच्या बाह्य स्वरुपाबद्दल अधिक चिंतित होत आहेत आणि नेहमी चांगले दिसण्यासाठी बदल किंवा सुधारणा शोधत आहेत, 2022 पर्यंत जग पुढे जाईल तसतसे नॉन-इनव्हेजिव सौंदर्य उपचारांची आवश्यकता वाढतच जाईल.