Supreme Court Reruitment: देशातील सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची संधी आता 10 वी पास झालेल्या उमेदवारालाही मिळणारा आहे. कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी ही भरती सुरु करण्यात आली असून  स्वयंपाक करता येत असेल तर तुम्हालाही या पदासाठी अर्ज करता येणार आहे. 23 ऑगस्टपासून या नोकरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. या भरती प्रक्रीयेद्वारे 80 रिक्त पदांसाठी देशभरातून या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 12 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.


शैक्षणिक पात्रता काय?


सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण झालेला असतावा. शिवाया एखाद्याकडे स्वयंपाक किंवा पाककला या विषयात किमान एक वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. त्याशिवाय नामांकित हॉटेल, रेस्टॉरंट, सरकारी विभाग किंवा PSU मध्ये किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. 


वयाची अट काय?


या भरतीसाठी उमेदवाराचे किमान 18 आणि कमाल वय 27 वर्ष असायला हवे अशी अट आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेच्या अटीत सूट देण्यात येणार आहे. 1  ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना करण्यात येणार आहे.


परीक्षेसह होणार मुलाखत


कनिष्ठ न्यायालय परिचर या पदासाठी लेखी परीक्षेसह प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखतही होणार आहे. यासाठी लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार असून हा पेपर हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल. प्रात्यक्षिक परिक्षेत तुमची ट्रेड स्कील टेस्ट घेण्यात येणार असून मुलाखत झाल्यानंतर उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची राहणार असून त्यात 30 सामान्य विज्ञानाचे तर 70 प्रश्न स्वयंपाकासंबंधित असतील. प्रात्यक्षिक परीक्षा 70 गुणांची राहणार असून मुलाखतीला 30 मार्क असतील. 


अर्ज करण्यासाठी शुल्क किती?


इच्छूक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य, ओबीसी आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जशुल्क 400 रुपये आहे. तर  SC, ST, आणि दिव्यांगांसाठी 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर त्यासंबंधीत सर्व तपशील वाचायला मिळतील.


या पदासाठी दरमहा किती पगार असेल?


कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी निवडल्या गेलेल्या इच्छूक उमेदवाराला या निवड झाल्यानंतर दरमहा 21 हजार 700 रुपये ते 46 हजार 210 रुपये मिळतील.


हेही वाचा:


लाडक्या बहि‍णींना द्या 'स्मार्ट' गिफ्ट; ओप्पोचा 5जी K12x फोन, स्वस्तात मस्त फिचर्स जबरदस्त