Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
एमएसईबीच्या महानिर्मिती युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आणि सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
एमएसईबी
विविध पदांच्या 661 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर), कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर)
शैक्षणिक पात्रता - सहाय्यक अभियंता पदासाठी इंजिनिअरिंग पदवी आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 661 (सहाय्यक अभियंता- असिस्टंट इंजिनिअरमध्ये मेकॅनिकलसाठी 122 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 122, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 61, विभागीय उमेदवारसाठी 34 जागा आहेत. तसंच कनिष्ठ अभियंता - ज्युनियर इंजिनिअरमध्ये मेकॅनिकलसाठी 116 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 116, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 58, विभागीय उमेदवारसाठी 32 जागा आहेत.)
वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2002
तपशील - www.mahagenco.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 10/2022 या लिंकवरची जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (UCIL)
पोस्ट - अप्रेंटिस (यात फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, सुतार, प्लंबर यांचा समावेश आहे.)
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा - 239
वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022
तपशील - ucil.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर jobs वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
SAMEER (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च)
पोस्ट - निम्न श्रेणी लिपिक, ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता - निम्न श्रेणी लिपिक पदासाठी 12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि., ड्रायव्हर पदासाठी 10वी उत्तीर्ण, हलके वाहन चालक परवाना, 5 वर्षांचा अनुभव, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 10वी उत्तीर्ण
एकूण जागा - 7 (यात निम्न श्रेणी लिपिक पदासाठी 4 जागा, ड्रायव्हरसाठी 2 जागा, मल्टी टास्किंग स्टाफसाठी 1 जागा आहे.
वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
नोकरीचं ठिकाण - मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 डिसेंबर 2022
तपशील - www.sameer.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)