Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


>> महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लिमिटेड


पोस्ट – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक


शैक्षणिक पात्रता - प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी पदवीधर आणि २ वर्षांचा अनुभव आणि प्रशिक्षणार्थी लिपिक पदासाठी  पदवीधर ही पात्रता हवी.


एकूण जागा – १९५


वयोमर्यादा - प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी २३ ते ३२ वर्ष आणि प्रशिक्षणार्थी लिपिक पदासाठी  २१ ते २८ वर्ष ही वयोमर्यादा हवी.


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२२


तपशील - www.mscbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


 



>> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


पोस्ट – विशेष कार्याधिकारी, उद्यान अधीक्षक, कनिष्ठ अभियंता


शैक्षणिक पात्रता – विशेष कार्याधिकारी पदासाठी  Mass Communication Degree, उद्यान अधीक्षक पदासाठी M.Sc (Horticulture), कनिष्ठ अभियंता पदासाठी B.E. (Electronics)


एकूण जागा - ३


अर्ज पाठवण्याचा पत्ता - उपकुलसचिव, प्रशासन शिक्षकेतर कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे- ४११००७


अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२२


तपशील - www.unipune.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर job openings वर क्लिक करा. Click here for advertisement वर क्लिक करा. ५ मेला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)



>> महत्वाची आठवण बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या भरतीविषयीची....


विविध ६९६ रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे.


पहिली पोस्ट – ऑफिसर (regular)


शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि ४ वर्षांचा अनुभव किंवा CA / ICWA/CISA आणि ३ वर्षांचा अनुभव. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.


एकूण जागा – ५९४


वयोमर्यादा – २८ ते ३८ वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०२२


तपशील - bankofindia.co.in


 


>> ऑफिसर (Contractual)


शैक्षणिक पात्रता - B.E./ B.Tech./ MCA, ७ ते ८ वर्षांचा अनुभव


एकूण जागा – १०२


वयोमर्यादा – २८ ते ३८ वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०२२


तपशील - bankofindia.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. त्यात recruitment of officers in various streams upto scale IV on regular & contract basis या लिंकवर क्लिक करा. Advertisement वर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)