Job majha : दहावी पास आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. जलशक्ती नागपूर, मुंबई राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
जलशक्ती, नागपूर
पोस्ट : कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास, जड वाहन चालवण्याचा परवाना, तीन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 26
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ऑफीस ऑफ द रिजनल डायरेक्टर, CGWB, सेंट्रल रिजन, एन.एस. बिल्डिंग, VCA च्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2022
तपशील : www.jalshakti-dowr.gov.in
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबई
पोस्ट : अधिकारी (विपणन)
शैक्षणिक पात्रता : नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस), अनुभव महत्वाचा आहे.
एकूण जागा : 18
वयोमर्यादा : 34 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2022
तपशील : www.rcfltd.com (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये Advertisement for the Post of Officer (Marketing) – E1 Grade या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि, नाशिक
पोस्ट : ITI ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 455 (यात फिटरसाठी 186 जागा, टर्नरसाठी 28 जागा, मशिनिस्टसाठी 26 जागा, कारपेंटरसाठी चार जागा, मशिनिस्ट (ग्राईंडर)साठी दहा जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 66 जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)साठी 6 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 8 जागा, पेंटरसाठी 7 जागा, शीट मेटल वर्करसाठी 4 जागा, मेकॅनिक (मोटर व्हेईकल)साठी 4 जागा, COPA साठी 88 जागा, वेल्डर (G & E)साठी ८ जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी)साठी 6 जागा आहेत.
एकूण जागा : 455
नोकरीचं ठिकाण : नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022
तपशील : www.hal-india.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Engagement of apprentice trainees at HAL-Nasik 2022-23 (ITI-Trades) या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)