Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी  (Raju Shetti) यांनी साखर काटामारीच्या मुद्यावरुन कारखानदारावर आरोप केला आहे. उसात काटामारी करुन कारखानदारांनी 4 हजार 581 कोटी रुपयांचा दरोडा टाकला असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. महाराष्ट्रातील साखर कारखाने राजरोसपणे सरासरी वजनाच्या 10 टक्के काटा मारतात. मागच्या हंगामात महाराष्ट्रात 13 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप झाले. म्हणजेच काटा मारुन 1 कोटी 32 लाख टन उसाची चोरी झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणालेत राजू शेट्टी


राजू शेट्टी यांनी एक फेसबूक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्यांनी साखर कारखानदारांवर आरोप केले आहेत. सक्षम अधिकाऱ्यांकडून ओटीपीघेतल्याशिवाय तलाठ्याला सात बाऱ्यात नोंदी करता येत नाहीत. ऑईल कंपनीने परवानगी दिल्याशिवाय पेट्रोल पंपचालकाला पेर्टोरल मोडमाप करणाऱ्या यंत्राशी छेडछाड करता येत नाही. मग साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला वजन काट्याशी छेडछाड करता येणार नाही, असा आदेश का निघत नाही? असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.


व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारं GST चं खातं गप्प का? 


राज्यातील साखर कारखाने हे सरासरी वजनाच्या 10 टक्के काटा मारतात असा आरोप शेट्टींनी केला आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात 13 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये राज्याची सरासरी रिकव्हरी ही 11.20 आहे. म्हणजेच 14.78 लाख टन एवढ्या साखरेची चोरी झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. ही साखर किरकोळ किराणा दुकान, मिठाईवाले, शितपेय कंपन्यास विना पावतीची विक्री केली जाते. सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे याची किंमत 4 हजार 581 कोटी रुपये होते. तर यामधून शासनास मिळणाऱ्या GST रुपातील कर हा 229 कोटी रुपये होतो. किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारं GST चं खातं का गप्प आहे? असा सवालही राजू शेट्टींनी केला आहे.  त्यामुळं दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत असेही राजू शेट्टी म्हणालेत.


महत्त्वाच्या बातम्या: