Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महाट्रान्स्को, सोलापूर महापालिका आणि मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचाय याची माहिती सविस्तरपणे,
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी
पोस्ट - इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, NCTVT
एकूण जागा - 38
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण - पुणे
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2022
तपशील - www.mahatransco.in (या वेबसाईटवर गेल्यावर latest news & updates मध्ये Apprenticeship Advertisement for 2022-2023 EHV O & M Division, Baramati, Pune Zone या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
सोलापूर महानगरपालिका
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, GNM, लॅब तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्त्रीरोग तज्ज्ञसाठी MD/DNB/ GDO, GNM साठी GNM/B.Sc नर्सिंग, लॅब तंत्रज्ञसाठी B.Sc., DMLT ही पात्रता हवी.
एकूण जागा - 37
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - आस्थापना - 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.solapurcorporation.gov.
मुंबई पत्तन प्राधिकरण (मुंबई पोर्ट अॅथॉरिटी)
पोस्ट - प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, रिअल इस्टेट एक्सपर्ट, क्वॉर्टर्स मॉनेटायझेशन एक्सपर्ट, प्रोक्युअरमेंट एक्सपर्ट, फायनॅन्स एक्सपर्ट, प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता - B.E., B.Tech, MBA, पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा - 8
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 नोव्हेंबर 2022
तपशील - www.mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)