T20 World Cup 2022: भारतात क्रिकेट खेळणाऱ्यांची आणि पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधी आहे. अशा कोट्यवधी लोकसंख्येतून केवळ 11 खेळाडूंना सामना खेळायला मिळतो, त्यामुळे टँलेंटसाठी किती रेस आहे, हे दिसून येतं. अशातच ऑस्ट्रेलियामध्ये देखील एक भारतीय वंशाचा 11 वर्षीय चिमुकला क्रिकेटचे धडे रंगवत असून आज त्याची भेट भारतीय संघाशी (Team India) झाल्याचं दिसून आलं. द्रुशील चौहान (Drushil Chauhan) असं या मुलाचं नाव असून ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये तो राहण्यास आहे. याच द्रुशीलला थेट भारतीय संघाशी भेटायला मिळालं असून कर्णधार रोहितला बोलिंग करण्याचीही संधी मिळाली... बीसीसीआयनं एक व्हिडीओ पोस्ट करत सारंकाही सांगितलं असून नेमकी स्टोरी काय आहे? पाहूया...
टी-20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाली असून सध्या सुपर 12 मध्ये जागा मिळवण्यासाठी क्वॉलीफायर सामने सुरु आहेत. टीम इंडिया आधीच सुपर 12 मध्ये असल्याने सध्या केवळ सरावांत व्यस्त असून न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामनेही खेळणार आहे. दरम्यान भारतीय संघ पर्थ येथे सराव करताना तिथल्या मैदानावर बरेच लहानगे सराव करत होते. त्याचवेळी भारतीय संघाची खासकरुन कर्णधार रोहितची नजर एका द्रुशील या 11 वर्षीय गोलंदाजांवर गेली. तो ज्या शिताफीने गोलंदाजी करत होता, ते पाहण्याजोगं होतं. त्यामुळे थेट द्रुशीलला रोहितनं बोलवून घेतलं आणि नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. टीम इंडियाची ड्रेसिंग रुमही दाखवली तसंच त्याला ऑटोग्राफही दिला.
टीम इंडियासाठी खेळायचंय द्रुशीलला
तर द्रुशीलला रोहितनं 'तू पर्थमध्ये राहतोस मग टीम इंडियासाठी कसा खेळशील असा प्रश्न विचारला, ज्यावर द्रुशीलनं मी भारतात येणार आहे, असं उत्तर दिलं. ज्यावर रोहितनं कधी येणार? असा प्रश्न विचारला असता जेव्हा मी तितका चांगला खेळेन तेव्हा' असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे बीसीसीआयनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत द्रुशीलची दमदार गोलंदाजी स्पष्टपणे दिसत असून त्याच्या उत्तरातून आणि बोलण्यातून कॉन्फीडन्सही दिसत आहे. त्यामुळे द्रुशीलमध्ये एक स्पार्क नक्कीच दिसून येत आहे.
पाहा बीसीसीआयनं पोस्ट केलेला द्रुशीलचा VIDEO
हे देखील वाचा-