Job Majha : अनेक तरूण नोकरीच्या शोधात असतात. परंतु, माहितीच्या अभावी काही जण चांगल्या नोकरीपासून वंचित राहतात. त्यामुळे एबीपी माझाकडून वेगवेगळ्या ठिकाणच्या भरतीबाबात माहिती देण्यात येत असते. युनियन बँक ऑफ इंडिया, महावितरण पुणे, राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर आणि अहमदनगर महानगरपलिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.  

युनियन बँक ऑफ इंडिया

पोस्ट :  एक्सटर्नल ULA हेड्स, अकॅडमीशियन्स, इंडस्ट्री ऍडवायजर, एक्सटर्नल फॅकल्टीज

शैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएशन, Ph.D., अनुभव

एकूण जागा :  33

वयोमर्यादा : 28 ते 60 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जानेवारी 2023

तपशील : www.unionbankofindia.co.in 

महावितरण, पुणे

पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

एकूण जागा : 37

वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023

तपशील : www.mahadiscom.in 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर

पोस्ट : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता  :  MBBS

एकूण जागा :  19

नोकरीचं ठिकाण : पालघर

मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर

मुलाखतीची तारीख : 3 जानेवारी 2023

तपशील : zppalghar.gov.in 

अहमदनगर महानगरपलिका

पोस्ट  : स्थापत्य अभियंता, नगर नियोजन विशेषज्ज्ञ, MIS विशेषज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता : B.E.सिव्हिल डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, कम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा

एकूण जागा  : 3

थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : आयुक्‍त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड

मुलाखतीची तारीख : 9 जानेवारी 2023

तपशील : amc.gov.in 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई व नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये भरती जाहीर