Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. SBI,सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कृषी विभाग येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर
कोल इंडिया लिमिटेड, नागपूर
एकूण 108 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - सिनियर मेडिकल स्पेशालिस्ट
- शैक्षणिक पात्रता - MBBS, PG पदवी/DNB, तीन वर्षांचा अनुभव
- एकूण जागा - 39
- वयोमर्यादा - 35 ते 42 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 ऑक्टोबर 2022
- तपशील - www.coalindia.in
पोस्ट - सिनियर मेडिकल ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता - MBBS
- एकूण जागा - 68
- वयोमर्यादा - 35 ते 42 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 ऑक्टोबर 2022
- तपशील - www.coalindia.in
पोस्ट - सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल)
- शैक्षणिक पात्रता -BDS, एक वर्षाचा अनुभव
- एकूण जागा - 01
- वयोमर्यादा - 35 ते 42 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 ऑक्टोबर 2022 (भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.)
- तपशील - www.coalindia.in (या वेबसाईटवर गेल्यावर career with CIL यावर क्लिक करा. jobs at coal india यावर क्लिक करा. Decentralised recruitment of medical executives in CIL/ WCL यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बँक ऑफ बडोदा
पोस्ट - प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशालिस्ट
- शैक्षणिक पात्रता - BE/ B.Tech/B.Sc-IT/ B.Sc(कम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA, अनुक्रमे तीन, चार, पाच वर्षांचा अनुभव
- एकूण जागा - 72
- वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022
- तपशील - www.bankofbaroda.in (या वेबसाईटवर गेल्यावर abous us मध्ये careers वर क्लिक करा. current opportunities मध्ये जा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. know more वर जा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
भारतीय पोस्ट
पोस्ट - मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, पेंटर, वेल्डर, सुतार
- शैक्षणिक पात्रता- संबंधित ट्रेडमध्ये एक वर्षाचा अनुभव, आठवी पास
- एकूण जागा- सात (यात इलेक्ट्रिशियन, सुतारसाठी प्रत्येकी दोन आणि मेकॅनिक, वेल्डर, पेंटरसाठी प्रत्येकी एक जागा आहे.)
- वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सीटीओ कंपाऊंड, तल्लाकुलम, मदुराई- 625002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
- तपशील - www.indiapost.gov.in