Job majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,  चलन नोट प्रेस नाशिक आणि वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया


विविध पदांच्या 800 जागांसाठी भरती होत आहे.


पोस्ट : फिल्ड इंजिनिअर, फिल्ड सुपरवायजर हवेत


शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), 1 वर्षाचा अनुभव, इंजिनिअरिंग डिप्लोमा (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


एकूण जागा : 800 (फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) साठी 50 जागा, फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) साठी 15 जागा, फील्ड इंजिनिअर (IT)साठी 15 जागा, फील्ड सुपरवायजर (इलेक्ट्रिकल) साठी 480 जागा, फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) साठी 240 जागा आहेत.)


वयोमर्यादा : 29 वर्षांपर्यंत


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022


तपशील : www.powergrid.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये job opportunities मध्ये openings वर क्लिक करा. ENGAGEMENT OF EXPERIENCED PERSONNEL ON CONTRACT BASIS for RDSS Scheme 2022 या लिंकवर क्लिक करा. detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


चलन नोट प्रेस, नाशिक


पोस्ट : सुपरवायजर, ज्युनियर टेक्निशियन


शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech, ITI (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.


एकूण जागा : 125


वयोमर्यादा : सुपरवायजरसाठी 18 ते 30 वर्ष, ज्युनियर टेक्निशियनसाठी 18 ते 25 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2022


तपशील :  cnpnashik.spmcil.com  (या वेबसाईटवर गेल्यावर Discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. 26 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ


पोस्ट : सहायक प्राध्यापक, संख्यिकी अधिव्याख्याता, आवासी


शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, MBBS MD P.S.M.


एकूण जागा : 24


नोकरीचं ठिकाण : यवतमाळ


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


मुलाखतीचा पत्ता : महाविद्यालय परिषद हॉल, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ


मुलाखतीची तारीख : 8 डिसेंबर 2022


तपशील : www.vngmcytl.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy/ recruiter मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)