Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, भारतीय खाद्य निगम, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. जाणून घ्या कसा अर्ज कराल? त्यासाठी पात्रता काय आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 



माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई


नॉन एक्झिक्युटिव्ह पदांच्या 1 हजार 41 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - नॉन एक्झिक्युटिव्ह पदं


शैक्षणिक पात्रता - 10 वी पास, डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग, ITI


एकूण जागा - 1041


वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - mazagondock.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये career- non executives यावर क्लिक करा. 9 सप्टेंबरला जाहीर झालेल्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


------------------------------------------------------------------------------------


भारतीय खाद्य निगम (FCI) याठिकाणी मेगाभरती निघाली आहे.


विविध पदांच्या एकूण 5 हजार 43 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - AG-III (यात तांत्रिक, सामान्य, खाते, डेपो यांचा समावेश आहे.) तसंच जेई (सिव्हिल), हिंदी टायपिस्ट AG-II, स्टेनो ग्रेड II या पोस्ट आहेत.


शैक्षणिक पात्रता - AG-III (तांत्रिक) या पदासाठी कृषी/वनस्पतीशास्त्र/जीवशास्त्र/बायोटेक/फूड यामध्ये पदवीधर,
AG-III (सामान्य) या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी तसंच संगणकाचं ज्ञानही आवश्यक आहे. AG-III (खाते) या पदासाठी B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे. AG-III (डेपो) या पदासाठी संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत. JE (EME) या पदासाठी 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा, जेई (सिव्हिल) पदासाठी 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा, हिंदी टायपिस्ट AG-II पदासाठी पदवीधर आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसंच भाषांतराचा एक वर्षाचा अनुभवही असावा. स्टेनो ग्रेड-II – पदवीधर, टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवं.


एकूण जागा - 5 हजार 43


वयोमर्यादा - 21 ते 28 वर्ष (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑक्टोबर 2022


तपशील - fci.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर current recruitment वर क्लिक करा. 3 सप्टेंबरच्या जाहिरातीवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


---------------------------------------------------------------------------------------


BPCL (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.)


पोस्ट - पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता - पदवीधर अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग पदवी, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - 87 (यात पदवीधर अप्रेंटिससाठी 42 जागा, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी 45 जागा आहेत.)


वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष


नोकरीचं ठिकाण - मुंबई


ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख - 5 ऑक्टोबर 2022


तपशील - www.bharatpetroleum.in


संबंधित बातम्या


Job Majha : IOCL मध्ये मेगा भरती सुरू, दहावी पास आणि पदवीधरांसाठी मोठी संधी