Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. CGHS मुंबई, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर याठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचे असल्यास ही बातमी सविस्तर वाचावी. जाणून घ्या


CGHS मुंबई (केंद्र सरकारची आरोग्य योजना, मुंबई)


पोस्ट - मल्टी टास्किंग स्टाफ, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लार्क


शैक्षणिक पात्रता - मल्टी टास्किंग स्टाफसाठी 10 वी उत्तीर्ण, फार्मासिस्टसाठी बी.फार्म, नर्सिंग ऑफिसरसाठी नर्सिंगमध्ये B.Sc., लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी 12वी उत्तीर्ण


एकूण जागा - 84


नोकरीचं ठिकाण - मुंबई


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2022


तपशील - cghs.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर news & updates मध्ये तुम्हाल चारही पोस्टच्या विविध जाहिरातीच्या लिंक दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


-----------------------------------------------------------


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, NET


एकूण जागा - 75


नोकरीचं ठिकाण - लातूर


अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रेसिडेंट, रॉयल एज्युकेशन सोसायटी, COCSIT, कॅम्पस, अंबाजोगाई रोड, लातूर


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2022


तपशील - srtmun.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. college recruitment वर क्लिक करा. Advertisement for the Teaching Posts यात College of Computer Science and Information Technology (COCSIT), Latur (03.11.2022) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


-----------------------------------------------------------------------------------------



समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर


पोस्ट - सहाय्यक कनिष्ठ अधिकारी, शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक)


शैक्षणिक पात्रता - सहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदासाठी पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MS-CIT, शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक) पदासाठी १०वी किंवा १२वी पास


एकूण जागा - 38


वयोमर्यादा - 30 वर्ष


नोकरीचं ठिकाण - सोलापूर


अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - hr@samarthbank.com


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2022


तपशील - www.samarthbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली माहिती मिळेल.)


-----------------------------------------------------------------------------------------


वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर


पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (यात ITI ट्रेड अप्रेंटिस आणि फ्रेशर्स ट्रेड अप्रेंटिस हवेत)


शैक्षणिक पात्रता - यात ITI ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI आणि फ्रेशर्स ट्रेड अप्रेंटिससाठी 10वी उत्तीर्ण ही पात्रता हवी.


एकूण जागा - 900


वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2022


तपशील - www.westerncoal.in (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये अप्रेंटिसमध्ये ट्रेड अप्रेंटिसवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)