Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पाहूयात वेगवेगळ्या क्षेत्रांतील भरतीसंदर्भात... 


भाभा अणू संशोधन केंद्र

पोस्ट - लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक

शैक्षणिक पात्रता - 10वी पास

एकूण जागा - 89 

वयोमर्यादा - 18 ते 27वर्ष

नोकरीचं ठिकाण - मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 जुलै 2022

तपशील - www.barc.gov.in

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

पोस्ट - संचालक, प्राचार्य, समन्वयक, प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - संचालक, प्राचार्य, समन्वयक पदासाठी Ph.D., किमान १० वर्षांचा अनुभव तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तांत्रिक व्यवस्थापक पदासाठी MBA आणि अनुक्रमे १० आणि ५ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 7

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - रजिस्ट्रार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड- ४३१ ६०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 आणि 10 जुलै 2022 (पोस्टनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

तपशील - www.srtmun.ac.in

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अहमदनगर

पोस्ट - कार्यक्रम समन्वयक / वरिष्ठ वैज्ञानिक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, चालक, सहाय्यक कर्मचारी (कामगार)

शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदवी, लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर पदासाठी १२वी पास, चालकासाठी १०वी पास, सहाय्यक कर्मचारी पदासाठी १०वी आणि ITI पास

एकूण जागा - 11

नोकरीचं ठिकाण - धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 जुलै 2022

तपशील - mpkv.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. जाहिरात - कृषि विज्ञान केंद्र, मफुकृवि.,राहुरी या लिंकमधली फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर

पोस्ट - रजिस्ट्रार, डीन (मानवता विद्याशाखा), डीन (विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा)

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी/ Ph.D.

एकूण जागा - 3

अर्ज पाठवण्याचा पत्ता - कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर - 413255

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 9 जुलै 2022

तपशील - su.digitaluniversity.ac