Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
विविध पदांच्या 330 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, ९ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 73
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022
तपशील - www.mahagenco.in
पोस्ट - अतिरिक्त कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, सात वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 154
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022
तपशील - www.mahagenco.in
पोस्ट - उपकार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 103
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ ऑक्टोबर २०२२
तपशील - www.mahagenco.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 09/2022 या लिंकमधली जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
IOCL
56 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - इंजिनिअरिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 26
पोस्ट - टेक्निकल अटेंडंट
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा - 30
वयोमर्यादा - 18 ते 26 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
तपशील - www.iocl.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Click here for Latest Job Opening यावर क्लिक करा. Recruitment of Non-executives in Pipelines Division यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई (TIFR)
पोस्ट - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी B.E./B.Tech, प्रशासकीय सहाय्यक पदासाठी पदवीधर, सुरक्षारक्षकसाठी दहावी उत्तीर्ण
एकूण जागा - 5
वयोमर्यादा - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी ३६ वर्ष, प्रशासकीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक पदासाठी २८ वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - एक ऑक्टोबर 2022
तपशील - www.tifr.res.in ( या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. follow us मध्ये tifr mumbai वर क्लिक करा. all notices वर क्लिक करा. career openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)